Types of Cotton Wicks: देव्हाऱ्यापासून मंदिरांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या वातींचे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण १४ प्रकार

घरातील देव्हाऱ्यासमोर, मंदिरात दिव्यांसाठी विविध प्रकारच्या वातींचा वापर होतो
Types of Cotton Wicks
Types of Cotton WicksSakal
Updated on

घरातील देव्हाऱ्यासमोर, मंदिरात दिव्यांसाठी विविध प्रकारच्या वातींचा वापर होतो. विविध सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन कापसापासून वाती तयार केल्या जातात. साधारणतः १४ प्रकारच्या वाती वापरल्या जातात. या वाती त्या-त्या सण-उत्सवाचे महत्त्व विशद करतात.

‘शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा।, शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तुते, दिव्या दिव्या दीपत्कार कानीं कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार’ असे दिव्याचे महत्त्व बालपणापासून मनावर बिंबवले जाते.

पूर्वी उजेडाचे माध्यम म्हणून दिव्याचा शोध लागला असावा. त्यानंतर कालांतराने दिव्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वातींचा वापर होत गेला. साधारणतः १४ प्रकारच्या वातींचा वापर होतो. त्यात नंदादीप वात किंवा समई वात ही ५, ७, ९ पदरी असते. ती रोज पूजेच्या वेळी लावतात. बेलवात ही श्रावणात लावतात.

एकाला जोडून एक अशा तीन वाती करतात. ११ पदरी वात कोणी दररोज तर कोणी महिनाभर ११ वाती लावतात. शिवरात्र वात ही महाशिवरात्रीला ११०० पदरांची वात तुपात भिजवून लावतात. वैकुंठवात ही ३५० पदरी असते. वितभर (करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर) ही वात असते. ती वैकुठं चतुर्दशीला लावतात. टिपूर वात तीन पदराच्या जोडून (३६५ अधिक ३६५) केल्या जातात.

Types of Cotton Wicks
सांगा, मुलांनी खेळायचे कुठे? शहरात दीडशे शाळा मैदानाविना, नियमांकडे डोळेझाक करून प्रशासनाचा मान्यतेचा ‘खेळ’

त्या त्रिपुरारी पौर्णिमेला लावतात. अधिक महिन्यात ३३ पदरी ३३ वाती, ३३ फुल वाती तुपात भिजवून लावतात. कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तीनपदरी १०५ वाती लावल्या जातात. काड वात ही अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून तयार केली जाते. श्रावणात दररोज महिनाभर ११ पदरांच्या ११ वाती लावल्या जातात.

फुलवाती या निरंजनात आरतीच्या वेळी वापरल्या जातात. देह वात ही आपल्या डोक्यावर टाळूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची १०८ किंवा ३६५ पदरी तयार केली जाते. ब्रह्मांड वात आपल्या कपाळावर कुंकू लावतो, त्या जागेपासून पूर्ण डोक्याला फेर घेऊन मोजून तेवढ्या लांबीची २५० पदरी बनवितात व ज्याच्या मापाची आहे, त्यांचे हातून तीळतेलात भिजवून लावली जाते. काकडा वात कपड्याचे बारीक-बारीक तुकडे करून त्यापासून तयार केली जाते.

अशा वापरतात वाती

रथसप्तमीला ७ पदरी

कृष्णाला ८ पदरी

रामनवमीला ९ पदरी

दशावतारी वात विष्णूला १० पदरी

शंकराला ११ पदरी

सूर्याला १२ पदरी

वैकुंठ चतुर्दशीला १४ पदरी

गणपतीला २१ पदरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com