Weight Loss Tips : रिकाम्या पोटी प्या हिंगाचे पाणी, झपाट्याने होईल वजन कमी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Weight Loss Tips : भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाल्यांचा आवर्जून वापर केला जातो. या मसाल्यांचा वापर केल्याने खाद्यपदार्थांना छान चव येते. या मसाल्यांमध्ये हिंगाचा देखील समावेश आहे.
Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal

Weight Loss Tips : भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाल्यांचा आवर्जून वापर केला जातो. या मसाल्यांचा वापर केल्याने खाद्यपदार्थांना छान चव येते. या मसाल्यांमध्ये हिंगाचा देखील समावेश आहे. चिमूटभर हिंग अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवण्यास मदत करते. यासोबतच हिंगामुळे फोडणीला छान तडका आणि सुगंध मिळतो.

परंतु, खाद्यपदार्थांना चव वाढवण्यासोबतच हिंगामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. हे तुम्हाला माहित आहे का? खाद्यपदार्थांमध्ये चिमूटभर हिंग मिसळण्यासोबत जर तुम्ही रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायले तर त्याचे अनेक फायदे आरोग्याला होऊ शकतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

Weight Loss Tips
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी दालचिनी-लिंबू पाणी पिण्याचा खरंच फायदा होतो का?

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

आजकाल वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना लठ्ठपणाची ही समस्या भेडसावत आहे. मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तुम्ही वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी हिंगाच्या पाण्याचे नक्कीच सेवन करू शकता.

हिंगाचे पाणी तुमच्या शरीरातील चयापचयाची क्रिया वाढवते. यामुळे, तुमची पचनक्षमता सुरळीत होते. पचनक्षमता सुरळीत झाल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर तुमच्या शरीराची चयापचय क्रिया जितकी मजबूत असेल तर, तितका याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी जरूर प्यावे. (helps for weight loss)

सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी

सध्या देशातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमध्ये ताप-सर्दी आणि खोकल्याच्या ही समावेश आहे. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचे पाणी एक उत्तम उपाय ठरू शकते.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे खोकला, ताप-सर्दीची समस्या आणि श्वसनाच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला या समस्यांनी ग्रासले असेल तर, सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी जरूर प्या. (Effective for cold and cough)

त्वचा सुधारण्यासाठी आहे लाभदायी

जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायले तर, तुमची त्वचा सुधारण्यास मदत होईल. यासोबतच त्वचा उजळेल आणि त्वचेवर एक प्रकारची छान चमक येईल. हिंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. त्यामुळे, हिंगाचे पाणी नियमितपणे प्यायल्यामुळे तुमच्या त्वचसोबतच आरोग्य निरोगी राहू शकते. (beneficial for improving skin)

Weight Loss Tips
Juice For Weight Loss : वाढत्या चरबीमुळे त्रस्त आहात? मग, आजपासून आहारात 'या' ज्यूसचा करा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com