Health Care News: वजन वाढायची चिंता सोडून मारा दिवाळीच्या फराळावर ताव; या तीन टिप्स ठेवा लक्षात

वजन वाढेल म्हणून घाबरत घाबरत फराळ करू नका... मनसोक्त फराळ करा फक्त या काही गोष्टी लक्षात ठेवा.
Health Care
Health Caresakal

सणं म्हटलं प्रत्येकजण उत्साहाने तो साजरा करतात आणि आपल्या आवडीच्या पदार्थावर ताव सर्वचजण मारतात. त्यात दिवाळी म्हटलं की, काय खाऊ आणि काय नको असे प्रत्येकाला वाटते. दिवाळीच्या फराळातील लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या अशा सर्व पदार्थांचा आपण मनसोक्त आस्वाद घेतो.

कित्येकदा आपण दिवाळीचा फराळ इतका खातो की, शेवटी आपले वजन वाढते. त्यामुळे कित्येकदा आपल्याला खाण्यावर संयम ठेवावा लागतो, पण सणसुदीला चांगले पदार्थ नाही खाणार तर कधी खाणार? तुम्हाला जर सणासुदीला मनसोक्त आवडीचे पदार्थ खायचे असतील आणि तुमचे वजन वाढू नये असे वाटत असेल तर त्यावर एक उपाय आहे.

तुम्हाला दररोज फक्त काही योगासन करायाचे आहेत. तुम्ही नियमित योगा करत असाल तर उत्तमच पण नसेल करत तर तुम्ही योगासन सुरु करू शकता. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

ताडासन 

उभे राहून करता येईल असे अगदी सोपे आसान आहे. आसान करण्यासाठी तुम्हाला ताट उभे राहवे लागेल त्यानंतर हात वर करून तळवे एकमेकांना जोडून ते हवेत वरच्या बाजूला स्ट्रेच करावे लागतात. या आसानामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि स्थायू बळकट आणि चपळ होतात.

पार्श्वकोनासन

हे आसन करताना साईड स्ट्रेचिंग करता येते. आसन करण्यासाठी सुरूवातीला आपला एक पाय 90 अंशामध्ये ठेवा आणि दुसरा पाय विरुद्ध दिशेला स्ट्रेच करा. आता 90 अंशाच्या काटकोन स्थितीमध्ये असलेल्या दिशेला कंबरेपासून खाली वाका आणि विरुद्ध दिशेने कानाच्यावर हात स्ट्रेच करा आणि दुसऱ्या पायाच्या समोर जमिनीवर हात टेकवा. या आसानामुळे फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यास आणि शक्ती वाढण्यास मदत होते.

Health Care
Health Care News: हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

वीरभद्रासन

या आसानाची सुरूवात ताडासन पासून होते. 5 अंशाच्या कोनात तुमचा विरुद्ध पाय 3-4 फूट दूर करा. लक्षात ठेवा की सरळ पाय समोर सरळ असावा. आता गुडघे सरळ वाकवा, लक्षात ठेवा की सरळ टाच विरुद्ध पायाच्या रेषेत असावी. श्वास घेताच, दोन्ही हात खांद्यापर्यंत वर करा, तळवे एकमेकांकडे उघडे असावेत. आता खांदे शिथिल करा आणि समोर पहा किंवा हात पहा. ही मुद्रा सोडताना, आपले हात खाली करा आणि श्वास सोडा. आता दोन्ही पाय एकत्र करा.आपला सरळ पाय मागे ठेवून आणि विरुद्ध गुडघा वाकवून दुसर्‍या बाजूला पोझची पुनरावृत्ती करा.

अश्वसंचलन

हे आसन म्हणजे सुर्य नमस्कारातील एक स्थिती आहे. हे आसन करण्यासाठी सुरवातीला एक पाय मागे घ्या आणि दुसरा पाय पुढे घेऊन 90 अंशाचा काटकोन करा. त्यानंतर मागचा पाय मागील बाजूला स्ट्रेच करा. हात वरच्या बाजुला घेऊन हाताचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडा आणि कंबरेपासून मागच्या बाजूला शक्य तितके स्ट्रेच करा. या आसनामुळे मेटॉलिजम आणि पचनक्रिया सुधारते.

नौकासन

हे आसन तुमच्या पोटाच्या पुढील आणि बाजुच्या मसल्सवर काम करते. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर बसा. तुमचे हात खांद्याच्या रेषेमध्ये सरळ ठेवा. पाठ सरळ ठेवा. आता तुमचे पाय आणि हाथ एकत्रच जमिनीवरून हवेत उचला. 45 अंशाच्या कोनामध्ये म्हणजेच व्हि-शेप मध्ये शरिराचा आकार तयार करा. 6 सेकंद अशाच स्थितीमध्ये राहा आणि मोठा श्वास घेण्याचा प्रयत्न करा.

जानु शीर्षासन

हे आसन करण्यासाठी जमिनीवर पाय पसरून बसा आणि पाय पुढच्या बाजुला स्ट्रेच करा. आता थोडे खाली वाकून गुडघ्याला डोके टेकविण्याचा प्रयत्न करा. हे आसन गुडघा आणि पाठीच्या कण्याचे स्ट्रेचिंग करण्यासाठी फायदेशीर ठरते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com