कोरियन फूड आवडतंय, मग, ही 5 पुस्तके नक्की वाचा

जगभरात सध्या कोरियन ट्रेंड खूपच गाजतो आहे
Korean food
Korean foodgoogle

जगभरात(World) सध्या कोरियन ट्रेंड (Korean Trend) खूपच गाजतो आहे. त्यात कोरियन सौंदर्य प्रसाधने, टिव्ही शोज, कॉमिक बूक्स, म्युझिक आणि सर्वांचा आवडता मुकबांग या सर्वांचा जागतिक स्तरावर प्रचंड बोलबाला आहे.

मुकबांग हा एक फूज शो म्हणून लोकप्रिय आहे. हा शो ऑनलाइन दाखवला जात असून त्याचा होस्ट प्रेक्षकांशी संवाद साधताना थोड्या थोड्या प्रमाणात केलेले पदार्थ खात असतात. २०१० मध्ये हा शो साऊथ कोरियात लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याची ख्याती जगभरात पोहोचली. नि:संशयपणे इतर 'कोरियन' ट्रेंड प्रमाणे मुकबांग भारतासह जगभरात लोकप्रिय झाला. दिवसेंदिवस कोरियन पाककृती देशात खूपच लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे कोरियन खाद्यपदार्थ ज्यांना आवडतात किंवा ते खाणे सुरू करायचे आहे, अशा के फूड लव्हर्सनी ही ५ कोरियन कुकबुक्स वाचलीच पाहिजेत

Vegetarian Dishes from My Korean Home' by Shin Kim
Vegetarian Dishes from My Korean Home' by Shin Kimgoogle

1) व्हेजिटेरियन डिशेस फ्रॉम माय कोरियन होम बाय शीन कीम (Vegetarian Dishes from My Korean Home' by Shin Kim)

या कुकबुकमध्ये ३० सोप्या, पौष्टीक आणि चवदार कोरियन शाकाहारी पाककृतींचा समावेश आहे. प्रत्येक रेसिपी फोटोसह दिली आहे. यात भाज्यांना मुख्य स्थान दिले असू कोरियन होम कुकींगचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे पुस्तक एक मार्गदर्शक आहे.

या कुकबुकबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. त्यात ' ताजे, हंगामी पदार्थ हे मुठभर आंबवलेल्या आणि मुरलेल्या कोरियन सॉससह एकत्रितपणे कसे मिळतात ते शोधा. ते अगदी मनापासून ताज्या पदार्थांना तिखट चव देण्यासाठी बेस फ्लेवर (spectrum of flavors) तयार करतात. सर्व पाककृती यू.एस. मधील होम कुक्ससाठी केल्या आहे. तसेच त्या शाकाहारी, ग्लूटेन-मुक्त आणि नट-मुक्त आणि सोप्या संदर्भासाठी ज्यांना गरजेच्या आहेत त्यांना टॅग करण्यात आल्या आहेत, असे म्हटले आहे

Korean food
Korean Diet: कोरियन मुलींसारखं स्लिम ट्रिम राहायचं आहे, फॉलो करा या टिप्स

2) मांगचीज बीग बुक ऑफ कोरियन कुकिंग बाय मांगची (Maangchi's Big Book of Korean Cooking' by Maangchi)

या पुस्तकात व्लॉगर मांगची प्रत्येकाला मुलभूत तंत्रे आणि टप्याटप्याने पदार्थ शिकवते. ज्यांनी यापूर्वी कधीही कोरियन पदार्थ केलेले नाहीत, त्यांना हे पुस्तक फायदेशीर आहे, या पुस्तकात मांगचीने काही वर्षांत केलेल्या कोरियन बार्बेक्यू, तळलेले चिकन ते बुलगोगी, बिबींबॅपर्यंत पदार्थांचा या पुस्तकात समावेश आहे. हे पुस्तक बौद्ध पर्वतीय मंदिरात केल्या जाणाऱ्या वेगन, शाकाहारी पदार्थांपासून ते रस्यावरील पदार्थ विक्रेत्यांचे पौष्टीक पदार्थ, तसेच कोरियन आया मुलांसाठी तयार करत असलेल्या जेवणाच्या सुंदर डब्यांविषयी हे पुस्तक अनुभव देते.

Korean food
वजन कमी करण्यासाठी 'K Pop Diet ट्रेंडमध्ये; जाणून घ्या फायदे?
Korean food
चांदीचे दागिने परिधान करतायं, मग 'मॅचिंगची' चिंता सोडा...

3) कोरियन होम कुकिंग बाय सोहुई कीम ( ​'Korean Home Cooking' by Sohui Kim)

हे पुस्तक 'सोहनमत' विषयी असून त्याचा कोरियन वाक्प्रचार 'हाताची चव' असा आहे. यात १०० हून अधिक पाककृती असून त्यात कुरकुरीत मुग बीन पॅनकेक्स, सीव्हीड सूप, स्पायसी चिकन स्ट्यू अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे. या पुस्तक वाचून वाचकांना दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठी अनेक नव्या आयडिया मिळतील. लेखिकेच्या मार्गदर्शनासह, तिच्या कुटूंबाच्या गोष्टी, कोरियातील प्रवासाची छायाचित्रे, कोरियन होम कुकिंग या गोष्टींचा पुस्तकात समावेश असून त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातही समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवायला मिळू शकते.

Korean food
Winter Diet: हिवाळ्यात रिकाम्या पोटी हे ६ पदार्थ खा आणि तंदुरुस्त राहा

कोरियाटाउन' बाय डेउकी हाँग आणि मॅट रॉडबार्ड (Koreatown' by Deuki Hong & Matt Rodbard)

युनायटेड स्टेट्सच्या आसपासचे कोरियाटाऊन हे जेवणाच्या मेजवान्या आणि उशिरापर्यंत हँगआउट्सचे पर्यायी शब्द आहेत. लेखक तुम्हाला १०० हून अधिर स्वादिष्ट पाककृतींसह, विविध कथा,मुलाखती याचा प्रवास दाखवतात. या कुकबुकबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. त्यात ' कोरियन अमेरिकन समुदाय जो एलएल ते न्यूयॉर्क पासून अटलांगा ते शिकागो पर्यंत पसरला आहे, तेथे नेमके काय घडत आहे, याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

5) द कोरियन वेगन कुकबुक बाय जोआन ली मोलिनारो (The Korean Vegan Cookbook' by Joanne Lee Molinaro)

या नव्या कुकबुकमध्ये तीने तिच्या आवडीच्या कुकबुकमध्ये, तिने तिच्या आवडत्या कोरियन पदार्थांचा संग्रह शेअर केला आहे, काही पारंपारिक आणि काही पुनर्कल्पित, तसेच तिच्या कौटुंबिक इतिहासाला आकार देणारे मार्मिक वर्णनात्मक स्नॅपशॉट्सही यात आहेत. तसेच स्थलांतरित अनुभवाचे हे समृद्ध चित्र आहे.

Korean food
Relationship Tips| ब्रेकअपनंतर नव्या नात्याची सुरुवात करताय? मग या चुका टाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com