esakal | आता जीमची नाही गरज; घरातील 'ही' काम करुन घटवा वजन

बोलून बातमी शोधा

how to reduce weight
आता जीमची नाही गरज; घरातील 'ही' काम करुन घटवा वजन
sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात प्रत्येक स्त्रीला छान सुडौल,कमनीय बांधा असावा असं वाटत असतं. त्यामुळे अगदी २० वर्षांच्या तरुणींपासून ४० वर्षांपर्यंत अनेक जणी बारीक होण्यासाठी (weight loss) किंवा फिट राहण्यासाठी जीम, वर्कआऊट यांचा आधार घेत असतात. मात्र, जीममध्ये तासनतास घाम गाळल्यानंतरही अनेक जणींना हवा तसा फरक जाणवत नाही. परिणामी, अनेक जणी मग डाएटकडे वळतात आणि मग वजन (weight) नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु, व्यायाम किंवा डाएट न करताही आता घरच्या घरीदेखील वजन सहज नियंत्रणात आणता येऊ शकतं. त्याामुळेच घरातील अशी कोणती काम (household work) आहेत, ज्यामुळे वजन आपोआप कमी होईल ते पाहुयात. (these household work help in burning calories may prove helpful in weight loss)

१. फरशी (लादी) पुसणे -

खरं तर आता प्रत्येकाच्या घरात घरकाम करणाऱ्या स्त्रिया दिसून येतात किंवा बाजारातदेखील आता लादी पुसरण्यासाठी मॉब सहज अव्हेलेबल होतात. परंतु, शरीरासाठी एक व्यायाम म्हणून लादी आपणच पुसावी. तसंच लादी पुसतांना ती कमरेत वाकून पुसावी. यावेळी मॉब किंवा जमिनीवर बसून लादी पुसू नये. कमरेत वाकून लादी पुसण्याचे अनेक फायदे आहेत. काम करतांना कमरेत वाकल्यामुळे कॅलरीज बर्न होत असतात. त्यामुळे पोट, पाय, कंबर आणि अन्य मांसपेशी असलेल्या भागातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. खासकरुन बेली फॅट लवकर कमी होतं. २० मिनिटे लादी पुसल्यामुळे १५७ कॅलरीज (calories) बर्न होतात असं म्हटलं जातं.

हेही वाचा: तरुणांनो,अकाली टक्कल पडतंय? मग ऐका डॉक्टरांचा सल्ला

२. कपडे धुणे -

कामं पटापट व्हावीत म्हणून अनेक जण घरात वॉशिंग मशीन आणतात. परंतु, ज्यावेळी आवश्यकता असेल किंवा प्रमाणेपेक्षा जास्त कपडे धुवायचे असतील तरच वॉशिंग मशीनचा वापर करावा. नाही तर, दररोज वापरायचे कपडे हातानेच धुवावेत. कपडे घासणे, धोपटणे,पिळणे या क्रिया करत असतांना आपल्या शरीराची हालचाल होत असते. त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न (burning calories) होतात. असं म्हटलं जात १ तास कपडे धुतल्यास दररोज ७० ते १४० कॅलरीज बर्न होतात.

३. स्वयंपाक करणे व भांडी घासणे -

स्वयंपाक करत असतांना आपली सतत स्वयंपाक घरात धावपळ सुरु असते. तसंच बराच वेळ आपण उभ्यानेच काम करत असतो. त्यामुळे हा एक प्रकारचा व्यायामच आहे. तसंच जेवण झाल्यावर भांडी घासणं हादेखील एक व्यायाम आहे. भांडी घासतांना हाताची हालचाल होते त्यामुळे तो एकप्रकारे हाताचा व्यायाम होतो. म्हणून स्वयंपाक करणे व भांडी घासणे हादेखील एक व्यायाम आहे.

( वरील प्रकारांमुळे वजन जरी कमी होत असले तरीदेखील कोणत्याही कामाचा अतिरेक करणं चांगलं नाही. त्यामुळे आपल्या शरीरानुसार, आरोग्यानुसारच कोणतंही काम करावं. शरीरावर या कामाचा ताण पडणार नाही याकडेही लक्ष द्यावं.)