Chocolate Day 2024 : ‘चॉकलेट डे’ च्या निमित्ताने 'या' खास पद्धतीने जिंका तुमच्या जोडीदाराचे मन

जगभरात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डे च्या आधी जवळपास आठवडाभर प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो.
Chocolate Day 2024
Chocolate Day 2024 esakal

Chocolate Day 2024 : जगभरात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डे च्या आधी जवळपास आठवडाभर प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. या ‘व्हॅलेंटाईन वीक’ ला नुकतीच सुरूवात झाली आहे. रोझ डे ने या वीकची सुरूवात झाली असून आज (८ फेब्रुवारीला) 'चॉकलेट डे' मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

‘चॉकलेट डे’ च्या निमित्ताने जर तुम्हाला तुमच्या पार्टनरचे मन जिंकून घ्यायचे असेल, तर त्यासाठी काही खास टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या खास टिप्सच्या आधारे तुम्ही तुमच्या पार्टनरचे मन जिंकू शकता आणि उत्साहात चॉकलेट डे साजरा करू शकता.

Chocolate Day 2024
Dark Chocolate Benefits : निरोगी हृदयासाठी आणि मेंदूसाठी डार्क चॉकलेट खाणे आहे लाभदायी, जाणून घ्या फायदे

स्पेशल डिनर डेट करा प्लॅन

चॉकलेट डे च्या निमित्ताने तुम्ही जोडीदारासाठी स्पेशल डिनर प्लॅन करू शकता. यामुळे, तुमची प्रिय व्यक्ती अधिक प्रभावित होईल. डिनर डेटसाठी तुम्ही जोडीदाराच्या आवडत्या जागेची निवड करू शकता. तुम्ही कॅंडल लाईट डिनरचा देखील प्लॅन करू शकता. तुमच्या डिनर डेटला सुरूवात करण्यापूर्वी पार्टनरला विविध प्रकारचे चॉकलेट्स किंवा चॉकलेटचे गिफ्ट हॅम्पर देऊ शकता.

ग्रीटिंग कार्ड करा गिफ्ट

चॉकलेट डे च्या निमित्ताने जोडीदाराला चॉकलेट्स देण्यासोबतच तुम्ही एखादे सुंदर ग्रीटिंग कार्ड देखील गिफ्ट करू शकता. आजकाल विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्ड्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेले आणि पेंट केलेले सुंदर ग्रीटिंग कार्ड भेट देऊ शकता. यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर खुश होईल, यात काही शंका नाही.

गुलाबांचा गुच्छ

चॉकलेट डे च्या दिवशी तुम्ही गुलाबांचा गुच्छ देखील जोडीदाराला देऊ शकता. या गुलाबाच्या गुच्छासोबत तुम्ही एखादे ग्रीटिंग कार्ड ही देऊ शकता. या व्यतिरिक्त गुलाबाच्या गुच्छासोबत तुम्ही पार्टनरला आवडणारे विविध प्रकारचे चॉकलेट्स, कॅडबरीज आणि कुकीज देखील देऊ शकता. यामुळे, तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश होईल आणि तुमचा चॉकलेट डे खऱ्या अर्थाने साजरा होईल.

Chocolate Day 2024
Valentine Day 2024 : जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे? मग, ‘या’ ऑफबीट ठिकाणांना नक्की द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com