esakal | घरी बॉडी पॉलिशिंग करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

घरी बॉडी पॉलिशिंग करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या!

जर तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे तुमच्या त्वचेला जास्तीत जास्त फायदा होईल.

घरी बॉडी पॉलिशिंग करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या!

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पुणे: जर त्वचेला (Skin) सुंदर आणि चमकदार बनवायचे असेल तर बॉडी पॉलिशिंग (body polishing) करणे निश्चितच एक उत्तम उपाय आहे. बॉडी पॉलिशिंग करणे केवळ आपल्या त्वचेतून डेड स्किन सेल्स (Dead skin cells)काढून टाकण्यास मदत करत नाही तर अनइवन स्किन टोन आणि इतर बर्‍याच समस्या देखील दूर करते, ज्यामुळे तुमची त्वचा (Skin) चमकू लागते आणि त्यास शाइन (Shine) देते. फक्त एवढेच नाही तर त्याचा वापर करुन तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये लगेच फरक दिसू लागेल. जरी बहुतेक स्त्रिया पार्लरमध्ये जातात आणि बॉडी पॉलिशिंग करतात, परंतु त्यामध्ये ते खूप पैसे खर्च करतात आणि म्हणूनच घरी बॉडी पॉलिशिंग करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. तर घरी बॉडी पॉलिशिंग करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला घरी पार्लरसारखे इफेक्ट दिसतील.

हेही वाचा: सलून-ब्युटी पार्लर चालकांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

या इंग्रीडिएंट्सपासून दूर राहा

तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असताना घरगुती स्क्रब बनवताना साखर किंवा बेकिंग सोडा यासारख्या विशिष्ट घटकांचा वापर करणे टाळा. हे तुमची त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकते. तसेच, जर ते योग्यरित्या वापरले गेले नाहीत तर ते तुमच्या त्वचेवर हार्श होऊ शकतात. तर, बॉडी पॉलिशिंगसाठी होममेड बॉडी स्क्रब बनवताना त्यातील घटकांबद्दल अधिक काळजी घ्या. या घटकांबद्दल कोणत्याही प्रकारचे अडचण असल्यास तुम्ही बाजारात उपलब्ध बॉडी स्क्रब वापरू शकता.

हेही वाचा: Unlock Nashik : सलून, ब्यूटी पार्लर व्यवसाय ४० टक्केच सुरू

स्किन टाईप बॉडी पॉलिशिंग करा

घरी बॉडी पॉलिशिंग करताना काळजी घेणे ही एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे. तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असताना हे लक्षात घ्या की ते आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ते असावे.

हेही वाचा: हॉट टॉवेल स्क्रब ट्राय केलंय? पाहा त्याचे शारीरिक फायदे

दबाव नियंत्रित करा

तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करत असताना ही एक अतिशय महत्वाची स्टेप्स आहे ज्याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही घरी बॉडी पॉलिशिंग करीत असाल तर त्वचेवर कठोरपणाने वागू नका. तुम्ही तुमच्या त्वचेवरील दबाव नियंत्रित करण्यास सक्षम असावे. विशेषत: शरीराच्या मऊ भागावर, जसे की अंडरआर्म्स आणि गुडघ्यांच्या मागे अधिक जोरदारपणे स्क्रब करणे टाळा कारण यामुळे तुमची त्वचा ताणू शकते.

loading image