esakal | सलून-ब्युटी पार्लर चालकांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

salon and beauty parlor

सलून-ब्युटी पार्लर चालकांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: राज्यात कोरोना संकटामुळं (corona crisis) अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. खासगी,सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक चक्र कोलमडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांची तर दयनीय अवस्था झाली आहे. कोरोनामुळं केंद्र सरकारकडून लॅाकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभरात कोरोनाच्या निर्बंधात सर्वांनाच राहावं लागलं. नोकरदार,व्यवसायिकांच्या खिशाला कात्री लागली. काही महिन्यानंतर कोरोनाची लाट ओसरली. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात झाली. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आली अनं सुरळीत झालेले जनजीवन पुन्हा विस्कटायला लागलं. राज्यात कोरोना निर्बंध असल्याने अनेक व्यवसायिकांना त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. कित्येकांनी राज्य सरकारकडे त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. आर्थिक चणचण भासणाऱ्या सलून व पार्लर व्यवसायिकांनी राज्य सरकारकडे त्यांच्या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी केली. (Allow to business on weekend hair cutting salons demand)

राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध लावण्यात आले. वीकेंड लॅाकडाऊनमुळे अनेक व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. सलून व पार्लर व्यवसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतय. या पार्श्वभूमीवर सलून आणि पार्लर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी राज्य सरकारकडे मागण्या केल्या आहेत.

हेही वाचा: 'चला संजय पाहू कोण कोणाला शिवथाळी देतं',

"राज्य सरकारने सलून आणि ब्यूटी पार्लर व्यवसाय सुरु करायला विकेंड लॅाकडाऊनमध्ये मुभा द्यावी. वीकेंडला शनिवारी आणि रविवारी सलून व्यवसायाची आर्थिक गणितं अवलंबून आहेत. सलून व्यवसायिकांना त्यांचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अडचणी येत आहेत. घरगुती खर्च सांभाळणेही कठीण झालं आहे. ज्या व्यवसायिकांना वीकेंड लॅाकडाऊन मध्ये व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे, तशीच परवानगी सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायीकांनाही द्या" अशी मागणी सलून आणि पार्लर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सोमनाथ काशीद यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

loading image