
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या प्रसिद्ध यात्रेला १५ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत चालेल, आणि सोलापूरसह कर्नाटका, आंध्रप्रदेश, पुणे, मुंबई आदी ठिकाणांहून हजारो भाविक सहभागी होतात. या ऐतिहासिक आणि धार्मिक यात्रेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात.