लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर या ८ चुका टाळा! Sex Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

couple sleep
लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर या ८ चुका टाळा! Sex Education

लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर या ८ चुका टाळा!

लग्नानंतर नवरा बायकोचे (Couple) नाते फुलणे फार महत्वाचे असते. तुमचे शारिरिक सबंध (Physical Relationshipजर अतिशय चांगले आणि ग्रेसफुल असतील तर दोघांमधले नाते अधिक बहरते. दोघांना एकमेकांची ओढ लागते. या परिपक्व शारीरिक सबंधामुळेच (Sex) दोघांचे वैवाहिक आयुष्यही चांगले जाते. अनेक कपल्स एकमेकांच्या गरजा सांभाळून हे नाते सुदृढ करण्याचा फार छान प्रयत्न करतात. पण काहींना ते जमतेच असे नाही. यामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो. तुमच्या नात्यात लैंगिक संबंधांची कमतरता असेल तर अनेक समस्या येऊ शकतात. तुमच्या काही सवयीही तुमच्या दोघांमधले अंतर वाढविण्यात कारणीभूत ठरू शकतात. तुम्हाला जर या 8 सवयी असतील तर लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ शकतं.

अशा आहेत ८ सवयी

१) आळस (Laziness)

लैगिक संबंधात ऊर्जा, पुढाकार घेणे आणि कधीकधी योग्य नियोजन आवश्यक असते. नवरा बायकोने ते घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. पण जर तुम्ही आळस करत असाल, सारखे थकलेले असाल तर मग समोरच्या पार्टनरला त्याचा त्रास होऊ शकतो. अशाने तो नाराज होऊ शकतो. आळस हा मोठा शत्रू आहे. म्हणून आळस दूर सारून खुल्या मनाने दोघे एकत्र या.

२) असंतुष्टता (Complacency)

काही काळानंतर तुम्हाला लैगिक संबंधांचा अंदाज येऊ शकतो. यातही तेच तेच करण्याची सवय लागणे सोपे आहे. पण स्त्रियांना लैंगिक संबंधांबद्दल दबाव जाणवू शकतो. कारण फक्त कृती नको असते तर त्यात आपलेपणा हवा असतो. तो देण्यासाठी काही वेगळे पर्याय आत्मसात करा.

हेही वाचा: शारीरिक संबंधासाठी बायकोचा नकार? जाणून घ्या पाच कारणे

 Couple

Couple

३) शरीराची काळजी घ्या ( Taking Care of Your Body)

रोजचा व्यायाम आणि हेल्दी खाण्याबरोबरच तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यावी. दोघांनीही वर्षातून किमान एकदा डॉक्टरकडे जाऊन आरोग्य आणि ताणतणावाचे स्तर तपासावेत. यामुळे तुम्हाला काही शारीरिक, मानसिक त्रास असेल तर ते समजून घेता येतात. त्यावर उपाय करून तुमचे शारीरिक संबंध बिघडले असल्यास पुन्हा पूर्ववत करता येऊ शकतात.

४) संवादाचा अभाव ( Lack of Communication)

घट्ट भावनिक नाते असेल तर तुमचे शारीरिक संबंधही उत्तम होतात. अशासाठी संवाद साधणे गरजेचे आहे. उत्तम सेक्सची सुरुवात भावनिक जोडणीने होते. महिलांसाठी, भावनिक संबंध फार गरजेचे असतात. त्यामुळे त्या लैंगिक संबंधात उत्तम सहकार्य करू शकताता. जेव्हा दोघांमधला संवाद संपायला लागतो तेव्हा विवाहास त्रास होतो. त्यामुळे सतत आपल्या गरजांविषयी, आवडीनिवडीविषयी, शारीरिक संबंधांच्या गरजांविषयी बोलत राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा: लैंगिक संबंधानंतर एकमेकांना मिठी मारून झोपण्याचे आहेत पाच फायदे

partner sleep

partner sleep

५) झोपेचा अभाव (Lack of Sleep)

रोजच्या धावपळीत पुरेशी झोप मिळणे काहीवेळा अवघड जाते. झोपेच्या अभावामुळे चिंता आणि नैराश्य वाढते. शारीरिक संबंधावरही त्याचा खूप परिणाम होतो. तुमची एकूण उत्पादकता कमी होते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला भरपूर झोप मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

६) नकारात्मक विचार किंवा बोलणे (Thinking and Speaking Negatively)

सतत नकारात्मक बोलण्याने नात्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. स्वतःबद्दल किंवा तुमच्या जोडीदाराबद्दल नकारात्मक बोलत राहिल्याने लैंगिक आकर्षणही कमी होते. जेव्हा लोकांना स्वतःबद्दल चांगले वाटत नाही, तेव्हा ते लैंगिक संबंधात कमी उत्साही असतात. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची आणि बोलण्याची सवय लावा.

हेही वाचा: डेटिंग अ‍ॅपपासून चुंबनापर्यंत लोकांनी गुगलवर सर्च केले अनेक प्रश्न

७) मुलांसोबत झोपा (Co-Sleeping with the Kids)

मुलांना अधूनमधून तुमच्या खोलीत झोपायला घ्या. जर एखाद्या मुलाला भयानक स्वप्न पडले तर त्याला किंवा तिला सुरक्षित वाटण्यासाठी तुमच्याजवळ झोपणे गरजेचे आहे. मात्र, ही सवय झाली की त्रास होतो. तुमची बेडरूम तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी राखीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून चार वेळा मुलांबरोबर झोपण्याचे नियोजन करा.

८) पॉर्नोग्राफी (Pornography)

पोर्न चित्रपट पाहून तुमच्या नात्यात जर वितुष्ट येणार असेल तर ते पाहणे टाळा. मजा म्हणून बघत असाल तर तिथेच पाहून सोडून द्या. त्यात दाखवलेली कृती करणे त्रासदायक जाऊ शकते. यामुळे तुमच्या शारीरिक संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.

हेही वाचा: घटस्फोटानंतर को-पॅरेन्टिंग करता येतं का?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top