अतरंगी फॅशन; Wet जीन्सचा ट्रेंड पाहून हसू होईल अनावर!

ही जीन्स लोकप्रिय होण्यासोबतच तिची खिल्लीही उडवण्यात येत आहे.
अतरंगी फॅशन; Wet जीन्सचा ट्रेंड पाहून हसू होईल अनावर!

गेल्या काही वर्षांमध्ये फॅशन क्षेत्रात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ग्राहकांची पसंती, बाजारात असलेला ट्रेंड यांकडे पाहून अनेक आऊटफिट्स वा अ‍ॅक्सेसरीज डिझाइन केली जात आहेत. यामध्येही एकेकाळी मुलींच्या फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जात होतं. मात्र, आता हळूहळू काळानुरुप मुलांच्या फॅशनकडेही तितकंच लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे बाजारात आता मुलांसाठी ट्रेंडी टी-शर्ट, जीन्स वा अन्य अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध होऊ लागले आहेत. परंतु, या फॅशनच्या नावाखाली अनेक जण काही तरी अतरंगी आऊटफिट घालून फिरत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या बाजारात जीन्सचे नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये क्रश जीन्स, रिप्ड जीन्स असे अनेक प्रकार दिसून येतात. या जीन्स तरुणाईमध्ये विशेष लोकप्रियदेखील आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Wet Pants हा जीन्सचा नवा प्रकार चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे ही जीन्स लोकप्रिय होण्यासोबतच तिची खिल्लीही उडवण्यात येत आहे. (this-company-is-selling-jeans-with-fake-pee-stains-wet-pants-denim-says-wet-look-dry-feel)

अतरंगी फॅशन; Wet जीन्सचा ट्रेंड पाहून हसू होईल अनावर!
पावसाळ्यातील ट्रेंड; रॅकमध्ये असलेच पाहिजे हे फुटवेअर

सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेली जीन्स Wet Pants Denim या ब्रॅण्डची आहे. या ब्रॅण्डने अत्यंत विचित्र पद्धतीने ही जीन्स तयार केली असून ती पुढच्या बाजूस पाण्याने भिजल्याप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे या जीन्सची सध्या चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ही जीन्स घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असून त्यासाठी हजारो रुपयेदेखील खर्च करण्यास तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.

अतरंगी फॅशन; Wet जीन्सचा ट्रेंड पाहून हसू होईल अनावर!
फाटक्या जीन्सचा ट्रेंड आला तरी कुठून? जाणून घ्या रंजक इतिहास

Wet Pants Denim च्या या अतरंगी जीन्सची किंमत ७५ डॉलर्स म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये इतकी आहे. ही जीन्स वेगवेगळ्या रंगात व डिझाइनमध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, या जीन्सला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. काहींच्या मते, ही हटके फॅशन आहे. तर काहींनी मात्र, या जीन्सची खिल्ली उडवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com