Marriage Shopping : लग्नासाठी पोशाख खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या

तुमच्या मनाजोगता लेहेंगा खरेदी करायला थेट बाजारात जाऊन शोध घेऊ नका. त्याआधी थोडा रिसर्च करा.
Marriage Shopping
Marriage Shopping google

मुंबई : लग्नाचं शॉपिंग हे एक मोठ्ठ काम असतं. त्यात जर वधुच्या साडी वा लेहेंगा खरेदीत गडबड झाली तर पूर्ण लूक खराब होऊ शकतो. जर तुम्ही बाजारातून लेहंगा खरेदी करणार असाल तर या सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

तुमच्या मनाजोगता लेहेंगा खरेदी करायला थेट बाजारात जाऊन शोध घेऊ नका. त्याआधी थोडा रिसर्च करा. यासाठी इंटरनेटवर अनेक साईट्स मधून तुम्हाला अशा लेहेंग्यांची डिझाईन्स मिळतील, त्यातून जे आवडेल ते डिझाईन आणि बजेट ठरवून तुम्ही बाजारात खरेदीसाठी जाऊ शकता.

Marriage Shopping
Relationship tips : या ५ गोष्टी केल्यास जोडीदाराशी तुमचे नाते अधिक दृढ होईल

बजेट निश्चित करा

तुम्ही आवश्यक संशोधन केल्यावर आता तुमचे बजेट ठरवा. वधूच्या लेहेंग्याची किंमत 15,000 ते 4 लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी जाण्यापूर्वी तुमचे बजेट ठरवा. हे तुम्हाला अतिरिक्त खर्च करण्यापासून थांबवेल.

रंग

तुमच्या लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणं हे मोठं जिकरीचं काम आहे. खरेदी करतेवेळी तुमच्या स्किन टोनला कुठला रंग खुलून दिसेल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. लेहेंग्याचे सर्व रंग तुमच्यावर खुलून दिसतीलच असं नाही. त्यामुळे रंगाची निवड अगदी काळजीपूर्व करा. लेहेंगा स्किन टोनला अनुरूप घेतल्याने तुमच्या सौंदर्यात भर पडेल.

कापड

लग्नाची खरेदी करताना लोक मटेरियल आणि फेब्रिककडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे लग्नाच्या दिवशी गोंधळ निर्माण होऊ शकतो. वधुचा ड्रेसचे फेब्रिक अयोग्य असू शकते. किंवा त्यावर केलेले भरतकाम तुमचा लुक बिघडवू शकते. म्हणून लग्नाचे कपडे खरेदी करतेवेळी ते योग्य पद्धतीने पारखून आणि एकदा वापरून पाहणे योग्य ठरेल.

Marriage Shopping
Relationship tips : नातेसंबंधात असूनही एकटेपणा वाटतोय ? ही आहेत कारणे...

हवामान

आपण ज्या ठिकाणी लग्न करणार आहोत, तेथील हवामानाचे भान लग्नाचा ड्रेस खरेदी करताना ठेवले पाहिजे. हिवाळ्यात लग्न करताना तुम्ही गडद रंगाचे कपडे निवडू शकता. पण तुमचे लग्न उन्हाळ्यात असेल तर तु्म्ही हलक्या शेडचा ड्रेस निवडावा. याशिवाय. तुम्ही कुठे लग्न करत आहात ती जागाही महत्वाची आहे. त्यानुसार खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

स्कार्फ आणि ब्लाउज

लेहेंगा फायनल करताना, दुपट्टा तपासायला विसरू नका. कारण तुमच्या लेहेंग्यात दुपट्टा महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तुमच्या वधूच्या फोटोंमध्येही ती महत्त्वाची भूमिका बजावते . तर बघा लेहेंग्यासोबत कोणता दुपट्टा जाणार आहे. ब्लाउज फिटिंगबद्दल विसरू नका. हे तुम्हाला चांगले बसेल आणि तुम्हाला आरामदायक वाटेल.

शरीराचा आकार

लग्नासाठी लेहेंगा निवडताना मुली शरीराच्या आकाराची काळजी घेत नाहीत. खरेदीवेळी मॉडेल किंवा डमी बघून खरेदी केल्यास हमखास गोंधळ उडू शकतो. कारण मॉडेल आणि तुमच्या शरीराची रचना यात नक्कीच फरक असतो. म्हणूनच जो ड्रेस आवडला आहे तो एकदा घालून पाहा. जर त्यात काही अडचणी असतील तर तु्म्ही तुमच्या डिझाईनरशी बोलून तो गोंधळ आधीच दुरूस्त करू शकता.

अल्टरेशन 

एकदा लेहेंगा घरी आणला की तो कपाटात ठेवून दिला असे करू नका. आधी घालून बघा. किंवा फिटींग आणखी चागंल करण्यासाठी डिझाईनरकडे अल्टरेशनला द्या. डिझाईनर तुम्हाला सूट होईल अशाच पद्धतीने फिटींग करेल. परफेक्ट फिटींग नसेल तर एवढा महागडा ड्रेस घेऊनही तुम्ही बेढब दिसाल. त्यामुळे काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com