esakal | घड्याळ खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

बोलून बातमी शोधा

घड्याळ खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
घड्याळ खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुरुषांच्या महत्त्वाच्या एक्सेसरीजमध्ये घड्याळाचा समावेश होतो. त्यामुळे वेळेचे भान राहण्यास मदत होते. तसेच स्टाईलमध्ये भर टाकते. त्यामुळे घड्याळाची निवडही योग्य व्हायला हवी. त्या विषयी काही टीप्स...

क्लासिक लूक

- प्रत्येक पुरुष जो एक्सेसरीजचा शौकीन आहे, तो घड्याळ तर घालतोच. मात्र कोणतेही हायफाय, आधुनिक, अपग्रेडेड घड्याळ खरेदी करण्यापूर्वीच एक क्लासिक लूक असलेले घड्याळ जरुर स्वतःच्या कलेक्शनमध्ये ठेवाच. ती साधी असतात. ती कोणत्याही क्षणी आणि कपड्यावर चांगले दिसते.

घड्याळाचा आकार कसा हवा

घड्याळ खरेदी करताना त्याच्या आकाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्या आकाराचे घड्याळ योग्य वाटेल ते खरेदी करा. मोठ्या मनगटीसाठी मोठे, तर छोट्यासाठी छोटे.

मॅकेनिकल आणि क्वार्ट्ज

घड्याळ दोन प्रकारचे असतात, एक मॅकेनिकल, दुसरे क्वार्ट्ज. या दोन्हीचे असणे सेकंडवाली काट्यांनी कळून जाते. मॅकेनिकल घड्याळात सेकंट काटा फारच हळूहळू फिरतो. दुसरीकडे क्वार्ट्ज घड्याळांचे सेकंड काटा टिक-टिकची आवाजाबरोबर पुढे सरकते. या पैकी निवडणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

बजेटकडे लक्ष द्या

तुम्ही घड्याळावर खूप खर्च करण्यास तयार असालही. मात्र खर्च करण्यापूर्वी जसे चौकस राहता तसेच घड्याळ खरेदी करताना राहा. आमचा तुम्हाला सल्ला असेल की १० हजारांपेक्षा जास्त रक्कम घड्याळावर खर्च करु नका.

बँडही वेगवेगळे

-डायव्ह स्टायल, लेदर बँड, ब्राऊन लेदर, रबर आणि प्लास्टिक बँड या बँडच्या घड्याळांचा तुमच्या आवडीनुसार निवड करा.

फेस टु फेस

घड्याळाचे डायल जिथे तुम्ही वेळ पाहता, तेच फेस. त्याचा रंग कोणताही असू शकतो. पांढरा, काळा आणि ग्रे. बिझनेस लुकसाठी तुम्ही काळा, पांढरा, डीप ब्लू आणि मेटल लूकची निवड करु शकता.

नंबर

- तुम्हाला यात डिजिटल डिस्प्ले मिळेल तर रोमन नंबरही. दोन्हीचेही वेगवेगळे लूक असते.

हँड्स

- हँड्स म्हणजे सेकंद आणि तास काटे. एकाच डायलच्या आत अनेक आणि आणखी डायल असतात. वेगवेगळ्य हँड्स चांगले वाटते.