Health Tips : तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स; आजार राहतील दूर...

कामाच्या शेड्युलमुळे अनेकांना स्वत:च्या आरोग्य, फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.
Health Tips : तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स; आजार राहतील दूर...
Summary

कामाच्या शेड्युलमुळे अनेकांना स्वत:च्या आरोग्य, फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.

आजकाल ऑफीस, जॉब, व्यवसाय यामुळे अनेकजण दिवसभर कामात व्यस्त असतात. त्यामुळे रोजच्या बिझी वेळापत्रकानुसार कमी वेळ मिळत असल्याची तक्रारही अनेकजण करत असतात. कामाच्या शेड्युलमुळे अनेकांना स्वत:च्या आरोग्य, फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण खाली दिलेल्या काही टिप्सवर अवलंबून तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता...

सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करा

सकाळचे पहिले जेवण म्हणजे तुमचा ब्रेकफास्ट होय. हा सकाळचा नाश्ता नेहमीच निरोगी आणि पौष्टिक असायला हवा. कारण हा भरपेट नाश्ता तुम्हाला दिवसभर चार्ज करत असतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत नाश्ता न करता बाहेर पडणे चुकीचे आहे. असे केल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. याशिवाय हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलचाही धोका वाढू शकतो.

नियमित फळे आणि भाज्या खा

आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण फळे खाणे शरीराला फायदेशीर आहे. त्यामुळे भाज्यांची अन्नाची योग्य निवड आणि त्यासाठी लागणारा किराणा खरेदी करताना प्रोटीन बार, मखाना, बाजरी यांसारखे आरोग्यदायी स्नॅक्स निवडा. तणावाखाली खाणे, साखर आणि मीठ जास्त खाणे, पॅकेज केलेले अन्न किंवा जंक फूड खाणे टाळा.

Health Tips : तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स; आजार राहतील दूर...
Tea : चहा पिणाऱ्यांना मृत्यूचा धोका कमी; अभ्यासातून आश्चर्यकारक माहिती समोर

कॅफिनच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

तुमच्या कॅफिनच्या सेवनाकडे लक्ष द्या. चहा-कॉफीऐवजी पाणी, लिंबाचा रस, नारळ पाणी, स्मूदी, दूध आणि कोल्ड्रिंक्सने स्वतःला हायड्रेट करत रहा.

शारीरिक हालचालींकडे लक्ष द्या

निरोगी चयापचयसाठी शारीरिक क्रियाकलाप आवश्यक आहेत. असे केल्याने झोपेचे चक्र सुधारते आणि रक्त प्रवाह वाढतो. दररोज सकाळी 15 मिनिटे चालायला जा.

Health Tips : तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स; आजार राहतील दूर...
Skin Care : मेकअपच्या आधी हे करा, स्कीन कायम चमकत राहील

व्हिटॅमिन 'डी' आणि 'बी' वर लक्ष ठेवा

व्हिटॅमिन 'डी' आणि 'बी' ची कमतरतेकडे आजकाल आजार म्हणून पाहिले जात आहे. ही समस्या खूप चिंताजनक आहे. कारण याचा परिणाम थेट हाडांवर आणि हार्मोनल आरोग्यावर होतो. या जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उन्हात चालू शकता. मशरूम, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करु शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहारही घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com