Tips : जिभेची स्वच्छताही आहे महत्त्वाची; कशी करायची जाणून घ्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tongh clean tips

Tips : जिभेची स्वच्छताही आहे महत्त्वाची; कशी करायची जाणून घ्या..

दात स्वच्छ करणे हे महत्त्वाचे आहे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे दात सगळेच स्वच्छ करतात.पण, जीभ स्वच्छ करण्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. दातांसोबत जीभ देखील स्वच्छ करावी अन्यथा काही त्रास उद्भवू शकतात. पण, जीभ स्वच्छ कशी करावी याबद्दल जाणून घेऊ या.

लसूण

जिभेच्या स्वच्छतेसाठी लसूण एक घरगुती उपाय आहे. रोज २-३ कच्चे लसूण चावून खाल्याने जिभेवरील सफेद थर निघून जातो. लसणामुळे मुखदुर्गंधी आणि संसर्ग होत नाही.

बेकिंग सोडा

जीभ स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरला जाऊ शकतो. लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट बोटांच्या मदतीने जिभेवर लावून मसाज करावा. थोड्या वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा.

मीठ

जिभेची स्वच्छता करण्यासाठी नॅचरल स्क्रब म्हणून मीठाचा वापर केला जाऊ शकतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने चुळ भरा. जिभेवर मीठ ठेऊन टूथब्रशच्या सहाय्याने घासूनही स्वच्छता करता येते.

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. त्वचा, केस आणि आपल्या आरोग्यासाठी कोरफडीचे खूप फायदे आहेत. जीभ स्वच्छ करण्यासाठीही कोरफडीचा वापर होतो. कोरफडीचे जेल जिभेवरील डाग दूर करून जीभ स्वच्छ करते.

हळद

हळदीमध्ये थोडासा लिंबाचा रस टाका. त्याचं मिश्रण काही वेळ जिभेवर लावून मसाज करा. जिभेवर हळद शिंपडून ब्रशच्या मागच्या बाजूने घासावे.

दही

दही खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. पण दह्याचा वापर करून जीभ स्वच्छ करता येते हे तुम्हाला माहीत आहे का?. प्रो-बायोटिक म्हणूनही दही काम करते. जिभेवर जमा झालेली बुरशी आणि पांढरा थर साफ करण्याचे काम दही करते. त्यासाठी जिभेवर थोडे दही ठेवून तोंड चालवा आणि मग पाण्याने धुऊन घ्या.

नारळाचे तेल

नारळाचे तेल वापरून तुम्ही जिभेवरील पांढरा थर दूर करू शकता. नारळाच्या तेलात अँटीसेप्टिक गुण असतात. नारळाच्या तेलाने रोज दोनदा गुळण्या केल्याने जीभेवरील सगळे बॅक्टेरिया नष्ट होतात.