Toothbrush History : खरं की काय! पहिला टुथब्रश डुकराच्या केसांपासून बनला होता?

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विल्यमने टूथब्रश बनवायला सुरुवात केली
Toothbrush History
Toothbrush History esakal

Toothbrush History : टूथब्रश हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. सकाळी उठून ब्रश करणे हा आपल्या दिनक्रमात समावेश आहे. बाजारात एकापेक्षा एक टूथब्रश उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक जण अजूनही टूथब्रशऐवजी आंबा, कडुनिंब अशा झाडांचे दातुन वापरतात. ब्रश करताना तुमच्या मनात हा प्रश्न कधी आला आहे की माणसाला टूथब्रशचा शोध कसा लागला? जगातील पहिला टूथब्रश कसा होता? हे पहिल्यांदा कोणी आणि केव्हा वापरले? 

राख, माती आणि दातुन इत्यादींनी दात स्वच्छ करण्याची परंपरा फार जुनी असली तरी टूथब्रशचा शोध लागला तर त्याचे श्रेय एका चिनी राज्यकर्त्याला जाते. इतिहासकारांच्या मते २६ जून १४९८ रोजी टूथब्रशचा प्रथम वापर चिनी शासक होंगझी यांनी केला.

असे मानले जाते की इस. पूर्व ३००० मध्ये लोक दात स्वच्छ करण्यासाठी झाडांच्या पातळ फांद्या वापरत असत. यानंतर चिनी लोकांनी इस. पूर्व. १६०० च्या सुमारास सुगंधी झाडांच्या फांद्या दात उजळण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली. सुगंधी झाडांच्या फांद्या दातुन म्हणून वापरणे हा दात उजळण्याबरोबरच दुर्गंधी दूर करण्याचा एक मार्ग होता.

Toothbrush History
Mouth Ulcers: सारखं तोंड येतंय मग ‘हे’ घरगुती उपाय करून पहा

यानंतर लोकांनी जनावरांचे केस लाकडी काठीवर चिकटवून दात साफ करण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत टूथपेस्टचा शोध लागला नव्हता आणि लोक या ब्रशवर माती, राख, अंड्याच्या सालीची पेस्ट आणि इतर अनेक गोष्टी लावून दात स्वच्छ करत असत.

डुकराच्या केसांपासून बनवलेला पहिला टूथब्रश

१४९८ मध्ये मिंग राजघराण्यातील चिनी राजा होंगझी यांनी डुकराच्या केसांचा वापर करून जगातील पहिला टूथब्रश तयार केला. लाकडी हातोड्याऐवजी त्याला हाड जोडलेले होते आणि त्यावर डुकराचे केस चिकटवले होते. असे मानले जाते की यामुळे दात चांगले स्वच्छ होतात.

होंगझीने बनवलेल्या या टूथब्रशचा ट्रेंड हळूहळू वाढू लागला आणि मग तो जगभर वापरला जाऊ लागला. लोक हा टूथब्रश वापरत असले तरी १६९० पूर्वी त्याच्या नावाचा कोणी विचारही केला नव्हता. १६९० मध्ये दात साफ करण्याच्या या अनोख्या गोष्टीला 'टूथब्रश' हे नाव मिळाले. अँथनी वूड नावाच्या व्यक्तीने आपल्या आत्मचरित्रात टूथब्रश हा शब्द पहिल्यांदा वापरला आहे. त्याने लिहिले की त्याने दुसर्या व्यक्तीकडून टूथब्रश खरेदी केला.

मिंग राजघराण्यातील चिनी राजा होंगझी
मिंग राजघराण्यातील चिनी राजा होंगझीesakal
Toothbrush History
Video: बांबूंचे Toothbrush बनवून पोहचले Shark Tank मध्ये

असे मानले जाते की विल्यम एडिस नावाच्या व्यक्तीला तुरुंगात असताना ब्रशचा व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर १७८० साली त्यांनी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर टूथब्रश बनवण्यास सुरुवात केली. विल्यमने बनवलेल्या टूथब्रशमध्ये डुकराच्या केसांऐवजी घोड्याच्या केसांचा वापर करण्यात आला होता.

विल्यमला ही कल्पना तेव्हा सुचली जेव्हा त्याने तुरुंगात असताना दात साफ करण्यासाठी इतर कैद्यांपेक्षा वेगळी पद्धत वापरली. इतर कैदी चिखल आणि राखेने दात स्वच्छ करत असताना विल्यमने एका हाडाला गोंद लावून त्यावर केस अडकवले. अशा प्रकारे विल्यमचा टूथब्रश तयार करण्यात आला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विल्यमने या पद्धतीचा व्यवसाय म्हणून वापर केला आणि टूथब्रश बनवायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या कंपनीचे नाव विझडम टूथब्रश कंपनी असे ठेवले, जे आजही अस्तित्वात आहे.

सन १८४४ मध्ये तीन ओळींचा पहिला टूथब्रश जगासमोर आला. या टूथब्रशच्या पोत आणि ताकदीत बदल झाले असले तरी त्यात जनावरांच्या केसांचा वापर केला जात होता. त्यानंतर १९३५ मध्ये वॉलेस कॅरीथर्स यांनी नायलॉन नावाचे सुपर पॉलिमर तयार केले.

तेव्हापासून जनावरांच्या केसांऐवजी टूथब्रशमध्ये नायलॉनचा वापर केला जात आहे. १९६० मध्ये इलेक्ट्रिक टूथब्रश पहिल्यांदा बाजारात आले.

जनावरांच्या केसांऐवजी टूथब्रशमध्ये नायलॉनचा वापर केला जात होता
जनावरांच्या केसांऐवजी टूथब्रशमध्ये नायलॉनचा वापर केला जात होताesakal
Toothbrush History
Old Toothbrush Side Effects : सकाळीच जूना फेकून नवा Toothbrush काढा, कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com