esakal | मुंबईतील बेस्ट इंटिरिअर डिझायनर्स; आता घर सजवणं होईल सोपं

बोलून बातमी शोधा

top interior designers
मुंबईतील बेस्ट इंटिरिअर डिझायनर्स; आता घर सजवणं होईल सोपं
sakal_logo
By
शर्वरी जोशी

'घर असावं घरा सारखं नकोत नुसत्या भिंती', असं कायम म्हटलं जातं. कोणत्याही घराला खरं घरपण हे तेथे राहणाऱ्या माणसांमुळे मिळत असतं. परंतु, कालानुरुप घर आणि कुटुंबपद्धती यांची संकल्पना बदलू लागली आहे. आजकाल प्रत्येकाला आलिशान फ्लॅटमध्ये राहायचं असतं. त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाण्याचा अनेकांचा कल वाढला आहे. लक्झरी अपार्टमेंटमध्ये घर घेतल्यानंतर अनेकदा ते नेमकं सजवायचं कसं म्हणजेच त्याचं इंटेरिअर करायचं कसं हा प्रश्न अनेकांना सतावतो. काही जण स्वत:च्या आवडीनिवडीने घर सजवतात. तर, काही जण मात्र, इंटेरिअर डिझायनरची मदत घेतात. सध्याच्या काळात घर सजवणाऱ्या अनेक इंटेरिअर डिझायनरची नावं चर्चेत आहेत. त्यामुळेच मुंबईतील सहा बेस्ट इंटेरिअर डिझायनर कोणते ते पाहुयात.

१. मानसी देसाई -

मुंबईतील बेस्ट इंटेरिअर डिझायनरपैकी मानसी देसाईचं नाव आवर्जुन घेतलं जातं. डिझाइन्स फॉर लिव्हिंग अशी मानसी देसाईच्या कंपनीची टॅगलाइन असून बदलत्या जीवनशैलीनुसार, त्यांच्या डिझाइन्समध्ये बदल होत असतो.

स्पेशालिटी - डायनिंग रुम, बेडरुम, होम ऑफिस डिझाइन, फर्निचरची निवड, नर्सरी रुम, वॉडरोब डिझाइन या सारख्या अनेक गोष्टींमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. मानसी देसाई यांचं विलेपार्ले येथे समर्थ रामदास रोड येथे ऑफिस आहे.

२. आदि इंटिरिअर्स -

ग्राहकांची मागणी, त्यांची आवडनिवड लक्षात घेऊन आदि इंटिरिअर्सची टीम काम करत असते. जीवनशैली व नैसर्गिक बाबी यांची सांगड घालून त्यांच्या डिझाइन तयार करण्यात आलेल्या असतात. बोरीवली पश्चिम येथे त्यांचं ऑफिस असून साधारणपणे ते एक घर डिझाइन करण्यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांचं पॅकेज घेतात.

स्पेशालिटी - लायटिंग डिझाइन, बाथरूम डिझाइन, लिव्हिंग रूम डिझाइन, स्पेस प्लानिंग,फ्लोअर प्लान,स्वयंपाकघराचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मिती.

३. सोनाली शहा -

सोनाली शहा यांना या क्षेत्रात २० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आज लोकप्रिय इंटिरिअर डिझायनरमध्ये त्यांचं नाव प्रथम स्थानावर घेतलं जातं.खासकरुन फर्निचरची निवड व रंगसंगती यासाठी त्या लोकप्रिय आहे. सोनाली शहा या साधारणपणे ५० लाख ते ५ कोटी रुपयांचं पॅकेज घेतात.

स्पेशलिटी -बेसमेंट डिझाइन, कस्टम बुककेस, बाथरूम डिझाइन,डायनिंग रूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, कस्टम बाथरूम व्हॅनिटिज.

हेही वाचा: कडक सॅल्युट! रणरणत्या उन्हात गर्भवती डीएसपी बजावतेय कर्तृत्व

४.संदीप कानविंदे -

वेळेत काम करण्याची हमी देणारे डिझायनर म्हणून संदीप कानविंदे यांच्याकडे पाहिलं जातं. ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांची टीम आधुनिक, पारंपरिक, कटेंम्पररी, क्लासिक थीमवर घराची रचना करतात. अंधेरीमधील मनिष नगर येथे त्यांचं ऑफिस आहे.

५. सायमा सालम -

वेळेपूर्वी काम पूर्ण करणे व उत्तम डिझाइन यासाठी सायमा सालम प्रसिद्ध आहेत. मालाड पूर्व येथे त्यांचं ऑफिस असून त्या २५ लाख ते ५ कोटी रुपये एका घराच्या डिझाइनसाठी घेतात.

स्पेशलिटी -किड्स बेडरूम डिझाइन, बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, डायनिंग रूम डिझाइन, फ्लोअर प्लान, फर्निचरची निवड.

६. दारा मिस्त्री -

दारा मिस्त्री यांची अॅस्ट्रल डिझाइन नावाची कंपनी असून ही कंपनी खासकरुन ऑफिस व घर सजवण्यासाठी लोकप्रिय आहे. प्रभादेवी येथे त्यांचं ऑफिस असून ते १५ लाख ते १० कोटी रुपयांचं पॅकेज घेतात.

स्पेशलिटी -डायनिंग रूम,कस्टम कॅबिनेट, बेसमेंट डिझाइन, बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन.