esakal | तजेलदार अन् मुलायम त्वचा हवीय? घराच्या दारातच दडलाय उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

tulsi is best for glowing skin nagpur news

अनेकांना वाटतं की आपली त्वचा तजेलदार आणि आकर्षित दिसावी. त्वचा चमकावी. त्यासाठी आपण अनेक कॉस्मॅटीकचा देखील वापर करत असतो. मात्र, या सुंदर त्वचेसाठी आपल्या घराच्या दाराताच उपाय दडलाय हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते.

तजेलदार अन् मुलायम त्वचा हवीय? घराच्या दारातच दडलाय उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आपल्या देशात तुळशीला पवित्र मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घराच्या दारात तुळशीचे रोपटे असते. कोणी त्याची पूजा करतात, कोणी केवळ सुगंधामुळे तुळशीला दारात ठेवतात. तसेच या तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत, जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. पण, दातांचा पिवळेपणापासून तर त्वचा तजेलदार दिसण्यापर्यंत सर्वासाठी तुळशीचा उपयोग होतो.

हेही वाचा - उशीर झाला तर मुक्काम करेन असं पत्नीला सांगितलं, पण सकाळी फोन खणखणला अन् सर्वच संपलं

दातांचा पिवळेपणा दूर करणे -
लहान मुलांपासून तर वृद्ध सर्वजण दात पिवळे दिसण्याच्या समस्येपासून ग्रस्त असतात. मात्र, तरुण वयात जर असे होत असेल तर ही सर्वात मोठी समस्या असते. त्याची तरुणांना चिंता देखील वाटते. दातांवरील पिवळेपणा आपला आत्मविश्वास कमी करतात. तसेच ब्यूटी आणि फॅशन वर्ल्डमध्ये करीअर करू पाहणाऱ्यांसाठी सुंदर आणि चमकणारे दात गरजेचे असतात. कारण त्यांना फक्त एका स्माईलने संपूर्ण प्रेक्षकांना भूरळ घालायची असते. मग हाच दातांचा पिवळेपणा दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावते ती तुळशी. यासाठी तुम्हाला बाजारामधून तुळशीची पावडर खरेदी करावी लागेल. तुम्हाला वेळ असेल तर घरीच तुळशीचे पाने वाळवून त्याचे चूर्ण बनवू शकता. मात्र, हे करताना तुळशीच्या पानांना सावलीत वाळवणे गरजेचे आहे. उन्हात वाळविल्याने तुळशीमध्ये असणारे गुण कमी होतात. यासोबतच संत्र्यांची साल घरात वाळवून त्याचीही भूकटी तयार करा. ही दोन्ही पावडर एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर या पेस्टने दातांवर हलका ब्रश करा. दर रात्री झोपण्यापूर्ण ही क्रिया करावी. त्यानंतर काहीही खायचे नाही. फक्त पाणी पिऊ शकता. ही क्रिया पूर्ण एक आठवडा केल्यास दातांचा रंग उजळून दात चमकायला लागतील. 

हेही वाचा - ...अन् ५० कोटी मिळवा, अजित पवारांची खुली ऑफर

चेहऱ्यावरील मुरूम घालविण्यासाठी -
तुम्हाला तुळशीमुळे चेहऱ्यावरील मुरुमापासून सुटका मिळेल. चेहऱ्यावर एखाद्या जागी पिंपल्स येत असेल तर त्याला मोठा होण्यापूर्वी तुळशीचा वापर करून तुम्ही त्याला दाबू शकता. त्यासाठी दोन-तीन तुळशीचे पानं घेऊन त्यात गुलाबजल घाला आणि ती पेस्ट पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे त्याठिकाणचे बॅक्टेरिया मरून पिंपल्स नाहीसे होतील. तसेच तुमचा चेहरा देखील सुंदर दिसण्यास मदत होईल.

चेहऱ्याचा रंग उजाळण्यासाठी -
चेहऱ्याचा रंग उजाळण्यासाठी तुळशी रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही तुळशीच्या ताज्या पानांचा किंवा तुळशीच्या पावडरा पण वापर करून शकता. तुळशीच्या पानांचा वापर करायचा असल्या १५ ते २० तुळशीची पानं घेऊन त्याची पेस्ट करायची. त्यामध्ये २ चमचे दूध घालायचे. त्यानंतर ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावायची. २० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा ताज्या पाण्यानी धुवायचा. त्यानंतर कापसावर गुलाबजल घेऊन पूर्ण चेहरा स्वचः करायचा. ही संपूर्ण प्रक्रिया एक आठवड्यापर्यंत केल्यास अंत्यत सुंदर आणि मुलायम त्वचा होण्यास मदत होईल. 

हेही वाचा - मेडीकलमध्ये प्रवेश देण्यासाठी पित्याने केला जीवाचा आटापिटा, पण एक चूक झाली अन् सर्वच संपलं

तुम्ही तुळशी पावडरचा वापर करत असल्यास त्यामध्ये २ ते अडीच चमचे दूध घालून पेस्ट बनवा. त्यानंतर ती चेहऱ्यावर लावा. त्यामुळे नक्कीच तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल.

तेलकट त्वचेसाठी वरदान -
तेलकट त्वचा आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स या समस्यांचा सामना करत असलेल्यांसाठी तुळशी रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुळशीचे फेस पॅकचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. हे जवळपास दोन महिने करावे. त्यानंतर एका आठवड्यातून ३ वेळा केलं तरी चालेल. हे सर्व उपाय आपल्या घरीच करता येतात आणि त्यासाठी खर्चही येत नाही. त्यामुळे तुळशीचे पाने आपल्यासाठी वरदान म्हणावे लागेल.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत