- सायली शिंदे, योगतज्ज्ञआजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, स्लीप डिस्क आणि स्पॉँडिलायसिस यांसारख्या समस्या वाढत आहेत. घर, ऑफिस, किचन आणि मोबाईल-लॅपटॉप यामध्ये झुकलेल्या शरीराचा भार संपूर्ण पाठीवर पडतो..मग सुरुवात होते हलक्या पाठदुखीची – जी वेळेत लक्ष न दिल्यास गंभीर स्वरूप धारण करते. परंतु योग हा एक असा उपाय आहे, जो केवळ दुखणं कमी करत नाही, तर शरीर मजबूत, लवचिक आणि शांतही करतं.योगासने नियमित केल्यास शरीराचे स्नायू बळकट होतात, मणक्याला योग्य आधार मिळतो आणि वेदनांमध्ये नक्कीच फरक जाणवतो..खालील काही सोपी योगासने दररोज केल्यास खूप दिलासा मिळतो -मकरासन - पोटावर झोपा, कपाळावर हात. पूर्ण पाठ सैल सोडा. काही मिनिटे शांत श्वसन करत राहा.भुजंगासन - पोटावर झोपून हाताच्या मदतीने छाती वर उचला. या योगासनामुळे पाठ मजबूत होते, मणक्यांना आधार मिळतो.शशकासन - गुडघे टेकवून कपाळ जमिनीवर ठेवा. या योगासनामुळे पाठ आणि मानेचा ताण कमी होतो.ही आसने सुरुवातीला तीन-चार वेळा करावीत. शरीर सवयीचं झाल्यावर हळूहळू वेळ आणि आवर्तन वाढवा. कोणतंही दुखणं अधिक असल्यास तज्ज्ञ मार्गदर्शनाखालीच आसने करावीत..प्राणायाम आणि ध्यानाचा आधारअनुलोम-विलोम - मज्जासंस्थेला बळ मिळतंभ्रामरी - तणाव कमी होतो, झोप सुधारतेसावकाश श्वसन - शरीराला आराम देतो.आरोग्यदायी आहारसकाळी - उकडलेले बदाम, हळद दूधदुपारी - घरचा साधा आहार – भात, वरण, भाजीसंध्याकाळी - सूप, ताजे फळरात्री - हलकं जेवण, मूगडाळ खिचडी, तूपहे टाळा - फास्टफूड, साखर, मैदा, थंड पदार्थहे वापरा - हळद, बडीशेप, ओवा, गूळ .दिनचर्यालवकर उठा. काम करताना मानेचा पोझिशन योग्य ठेवा. झोपताना मध्यम कडक गादी व योग्य उशी घ्या. तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यान व सकारात्मक वाचन करा. महिला म्हणून आपण सगळ्यांची काळजी घेतो; आपल्या शरीराकडे पाहणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. स्वतःसाठी द्या. शरीर तुमचं ऐकेल, आणि दुखणं हरवेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.