- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
मैत्रिणींनो, आपण सर्व स्त्रिया नैसर्गिकता जरा जास्त भावनिक असतो. भावना सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये महत्त्वाच्या आहेत; पण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये त्या अधिक खोलवर प्रभाव टाकतात. भावनांचा परिणाम अगदी आपल्या शरीररचनेपासून, सामाजिक भूमिकांपर्यंत प्रत्येक घटनेवर परिणाम करत असतो. त्यामुळे भावनांना योग्य प्रकारे समजून घेणं आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं तुम्हा आम्हा स्त्रियांच्यासाठी अधिक महत्त्वाचं ठरतं.