
शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
कधीतरी राग येतो आणि तो चटकन निघूनही जातो, तर कधी तोच राग खूप तास टिकतो, खूप दिवस टिकतो. कधी एखाद्या गोष्टीमुळे खूप आनंद वाटतो आणि ‘ते फीलिंग’ खूप वेळ टिकून राहते. कधी anxiety किंवा निराशा वाटते आणि ही निराशा अधूनमधून नकळत जाणवत राहते. या सगळ्या अनुभवांच्या मागे असतात भावना, त्यातून निर्माण होणाऱ्या जाणिवा आणि यावर अवलंबून असते आपली एकूण मनःस्थिती. यालाच इंग्रजीत आपण म्हणतो, इमोशन्स, फीलिंग्ज आणि मूड्स. मात्र, हे सगळे नेमके काय असतं आणि हे तिन्ही वेगळे कसे असते, आणि आपल्यावर यांचा कसा प्रभाव असतो, हेच आज आपण सोप्प्या भाषेत समजून घेणार आहोत.