
शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
एखादी व्यक्ती खूप समजूतदार आहे असे जेव्हा आपण कुणाबद्दल म्हणतो, तेव्हा त्याचा नेमका काय अर्थ असतो? समजूदारपणा म्हणजे नेमके काय? समजूतदार व्यक्ती म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर समतोल ठेवू शकते, आपली नाती नीट ‘मॅनेज’ करणे, ती; असे आपल्याला वाटते. पण समजूतदार असणे म्हणजे नेमके काय, याचा धडा कोणत्याही शाळा-कॉलेजात दिला जात नाही. आपल्या घरांमध्येही याची ठरवून, जागरूकपणे चर्चा आपण क्वचितच करतो. समजूतदार असण्याची अपेक्षा आणि इच्छा सगळ्यांची असते; पण त्याची व्याख्या किंवा समजूतदारपणे वागण्याचे कोणतेही ‘टेम्प्लेट’ आपण तयार करत नाही.