Healthy Diet: पौष्टिक पदार्थांचा अभाव हे अनेक आजारांचं कारण; ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं कशी असावी रोजची थाळी?

Healthy Diet: 'इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) च्या प्रमुखांनी बुधवारी भारतीयांच्या खाण्याच्या सवयींबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिध्द केले आहे. पोषक पदार्थांचा अभाव हे अनेक आजार उद्भवण्याचे मुख्य कारण आहे.
Healthy Diet:
Healthy Diet: Sakal

Healthy Diet: सध्या मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडताना दिसत आहेत. वातावरणातील बदलासह भारतीयांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीदेखील यासाठी कारणीभूत असल्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हटलं आहे. यामुळेच तज्ज्ञांनी भारतीयांच्या खाण्याच्या सवयींबाबत मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. यानुसार रोजची थाळी असेल, तर आवश्यक सर्व पोषक तत्वे आपल्याला मिळतील असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ICMR ने खाण्याच्या सवयींबाबत सांगितलेले मार्गदर्शक तत्त्वे

खानपान मार्गदर्शक तत्त्वे 'दिन की मेरी थाली' या शीर्षकासह शेअर केली आहेत. कमीतकमी आठ खाद्यपदार्थांमधून मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि सुक्ष्म पोषक तत्वे घेण्याची शिफारस केली आहे. यामध्ये भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा जेणेकरून शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळेल.

आहारात धान्यांचे प्रमाण मर्यादित असावे

दुसरा मोठा भाग कडधान्य आणि बाजरी यांचा आहारात समावेश असावा. यानंतर डाळी, मांसाहार, अंडी, सुका मेवा, आणि दूध किंवा दही येतात. एका प्लेटमध्ये 45 टक्के धान्य असावे तर कडधान्ये, अंडी आणि मांसाहारासाठी एकूण ऊर्जा टक्केवारी 14 ते 15% इतकी असावी.

Healthy Diet:
Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात कोल्ड्रिंक हानिकारकच, घरगुती पेय घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

30 टक्के ऊर्जेसाठी फॅट्स असावे. तर शेंगदाणे, तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दररोज एकूण ऊर्जेच्या 8-10% बनले पाहिजेत. आपल्या रोजच्या आहारातील साखर, मीठ आणि चरबी कमी करण्यासाठी आपण अधिकाधिक फळे आणि भाज्या खाव्यात. विशेषतः गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना शक्य तितके दूध, अंडी आणि मांस खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ICMR ने जाहीर केलेल्या बुकलेटमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दररोज एकूण ऊर्जेमध्ये धान्यांचा वाटा 50 ते 70% असतो. कडधान्ये, मांस, कुक्कुटपालन आणि मासे मिळून एकूण दैनंदिन उर्जेमध्ये 6 ते 9% योगदान देतात. तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे कोणती?

मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनेक लहान मुले कुपोषणाला बळी ठरत आहे. अनेक राज्यांमध्ये, बहुतेक मुले जास्त वजन, लठ्ठपणा आणि मधुमेहाने त्रस्त आहेत. पोषक पदार्थांचा अभाव, साखर आणि मीठ खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

जेवणाची थाळी कशी असावी?

संतुलित आहारामध्ये ४५ टक्क्यांपेक्षा जास्त कॅलरीज नसाव्यात. यामध्ये कडधान्य, बीन्स आणि मांसमधून 15 टक्के कॅलरीज मिळाव्यात. रोजच्या आहारात भाज्या, फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करावा असा सल्ला दिला आहे. दुसरा मोठा भाग धान्य आणि बाजरी यांचेही सेवन करावे. डाळी, मांसाहार, अंडी, सुका मेवा आणि तेलबिया आणि दूध यांचे सेवन करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com