Uric Acid Remedies : शरीरात घर करून बसलेलं युरिक अ‍ॅसिड पाण्यासारखं वाहून जाईल, फक्त आहारात ही गोष्ट करा सामील

ओव्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यास मदत करतात
Uric Acid Remedies
Uric Acid Remedies esakal
Updated on

Uric Acid Remedies :

लोकांना कॅन्सर, दमा या आजारांसोबतच शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढण्याचा आजारही वाढला आहे. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पाण्याचे कमी सेवन आणि कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते.

खरं तर युरिक अॅसिड घाणीसारखं शरीरात जमा होतं. शरीरातील रक्तात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले तर सांधेदुखी, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकाराचा झटका यासारखे धोकादायक आजारही होऊ शकतात.

अनेकदा असंही होतं की, युरिक अ‍ॅसिड शरीरात स्फटिकांचं रूप घेतं आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागतं. ज्यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते. हा आजार वाढल्याने अनेक गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागते. हे अ‍ॅसिड कसे करण्यासाठी तुम्हाला किचनमधील एका मसाल्याचा फायदा होईल. हा मसाला म्हणजे ओवा होय.

ओव्यामध्ये असलेले पोषक गुणधर्म

प्रथिने, फॅट, फायबर आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि निकोटिनिक ॲसिड या व्यतिरिक्त, ओव्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.

भजी किंवा इतर खमंग पदार्थात वापरल्या जाणाऱ्या ओव्यामध्ये ल्युटॉलिन, 3-एन-ब्युटिल्फ्थालाइड आणि बीटा-सेलेनिन नावाची उल्लेखनीय संयुगे रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी कमी करतात. याचे सेवन करणे संधिरोगाच्या हल्ल्यांना चालना देणारे दाहक नायट्रिक ऑक्साईड तयार करतात.

 

यूरिक ॲसिडच्या रुग्णांनी अशा प्रकारे करावे ओव्याचे सेवन

झोपण्यापूर्वी एका ग्लासमध्ये एक चमचा ओव्याचे दाणे टाका आणि रात्रभर ते पाण्यात भिजूद्या. हे पाणी गाळून सकाळी प्यावे. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास आल्यामध्ये मिसळून ओव्याचे खाऊ शकता. हे दोन्ही उपाय प्रभावी आहेत.

 

ओवा खाण्याचे इतर फायदे

जर तुम्हाला ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल. तर ओवा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यात अँटिस्पास्मोडिक आणि कार्मिनिटिव्ह गुणधर्म आहेत. जे या दोन्ही समस्यांपासून आराम देतात. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ओवा देखील गुणकारी आहे.

यात दाहक-विरोधी घटक असतात जे सांधेदुखीशी संबंधित समस्यांपासून आराम देण्यास मदत करतात. ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. हे अँटी-बॅक्टेरियल घटक सर्दी आणि खोकल्यासारख्या विषाणूजन्य संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.