
कोल्हापूर : लग्न म्हटलं की कोणतीही मुलगी आपल्या कपड्यांच्या बाबतीत आणि दागिन्यांच्या सिलेक्शन बाबतीत खूप एक्सायटेड असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यांचं अस करणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये सुंदर आणि उठावदार दिसायचे असते. पण बऱ्याचदा मुली लग्नासाठी आवश्यक ते आऊटफिट सिलेक्ट करताना कन्फ्युज होताना दिसून येतात. पण याबाबतीत प्रत्येक मुलगी कन्फ्युज असतात असे नाही.
पण कम्फर्टेबल आऊटफिट सिलेक्ट करण्यात आपण कन्फ्युज होतो. पण आजकाल तर ट्रेंड आहे. प्रत्येक ड्रेसनुसार त्या ड्रेसचे आऊटफिट पण वेअर करायचे असतात, तेव्हा लग्नाआधी आणि लग्नानंतर, त्याच बरोबर लग्नात देखील आपण कोणते आउट फिट युज करायचे हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या लग्नात असोत किंवा फंक्शनमध्ये एकदम कम्फर्टेबल फील करू शकाल.
- एकटीव्ह वेअर
लग्नाआधी प्रत्येक मुलगी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिम जॉईन करत असते. शॉपिंगच्या गडबडीत त्यांचा बराचसा वेळ निघून जातो. अशातच तुम्ही जर का कम्फर्टेबल ऍक्टिव्ह वेअर करत असाल तर तुमची धावपळ करताना होणारी दगदग कमी होऊ शकते. जिममध्ये वेअर करता येईल आणि शॉपिंग करताना कम्फर्टेबल फील करता येईल. यासाठी स्टाइलिश स्पोर्ट्स ब्रा, ब्रेदेबल आणि स्ट्रेची लेगिंग्स त्याचबरोबर सुपर कंन्फर्टेबल टी-शर्ट्स तुम्ही वेअर करू शकता. याच ऐक्टिव वेअर्समुळे तुम्ही तुमच्या लग्नाच्या संगीत फंक्शनची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. आणि विशेष म्हणजे लग्नानंतर जर का तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जिमला किंवा रनिंगला जात असाल तर तुम्ही या ऍक्टिव्ह वेअर्समुळे स्वतःला कम्फर्टेबल फील करू शकता.
- ब्राइड ब्रास
चुकीच्या ब्रा वेअर केल्यामुळे तुमच्या शरीराचा आकार बिघडून जातो. तेव्हा जस तुम्हाला डिझायनर ड्रेस महत्वाचा वाटतो. तसच त्यासाठी योग्य ते आउट फिट वेअर करणे गरजेचे आहे. शक्यतोवर मुली लग्नात घालण्यासाठी लेस ब्रा, कॉकटेल पार्टी साठी स्ट्रैपलेस ब्रा, ब्लाउजसोबत घालण्यासाठी बैकलेस ब्रा, रिसेप्शनमध्ये गाउन घालत असताना अप ब्रा युज करत असतात. पण जर का आपण ऑफशोल्डर, कॉकटेल पार्टी ड्रेस घातला असेल तर तुम्हाला स्ट्रैपलेस ब्रा वेअर करावी लागेल. अशा ब्रा निवडताना तुम्ही एक काळजी घ्यायची, की ती घेताना परफेक्ट फिटिंगची आहे की नाही, आपल्याला नीट फिट येतेय की नाही. ब्लाऊज वर घालण्यासाठी तुम्ही बॅकलेस ब्रा चा युज करू शकता. त्याचबरोबर स्टाइल ब्लाउज घातले असेल तर ट्रास्पैरेंट बैक बैंड ब्रा ची पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल.
- सिमलेस शेपवेअर
जर तुम्ही तुमच्या वेडिंग ड्रेसमध्ये अल्ट्रा-स्ट्रीमलाइन्ड लूक हवा असेल तर तुम्ही नक्की सिमलेस शेपवेयर आउट फिट युज करायला पाहिजे. यामुळे तुमच्या ड्रेसला एक वेगळा लूक येईल. वेगवेगळ्या प्रकारचे शेपवेयर असतात, जस्व की, बॉडी सूट, थाई शेपर्स, साडी शेपवेयर आज टमी टकमर्स. हे शेपवेयर तुम्हाला कॉन्टूर्ड लुक तर देणारच त्याचबरोबर तुम्हाला हे वेअर केल्यानंतर एक कॉन्फिडन्सपण येतो.
- नाईट वेअर्स
लग्नानंतर तुम्हाला नक्कीच रिलॅक्स व्हावंसं वाटत लग्नात 5 ते 6 दिवस तुम्ही सारखे डिझायनर कपडे घातलेले असतात. त्यामुळे तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. हेवी ज्वेलरी घालून तुमची खूप चिडचिड होऊ शकते. अशातच तुम्हाला लग्नानंतर हनिमूनला ही जायचं असत. अशा वेळी आपोआपच आकर्षक, कम्फर्टेबल नाईट वेअर्सचे महत्व वाढून जाते. तेव्हा मार्केटमध्ये आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला सहज नाइटगाउन्स आणि पायजामा सेट्स लॉन्जरी उपलब्ध होऊन जाईल.
तेव्हा मैत्रिणींनो तुम्हीच आपल्या फक्शन नुसार आणि इतर गरजेनुसार वेळेनुसार या लॉजरीचा वापर करू शकता. यात तुम्ही नक्कीच कम्फर्टेबल आणि रिलॅक्स फील कराल.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.