ताण कमी करायचाय? मग Stress Toys करा ट्राय

तरुणाईचा ताण हलका करणारी खेळणी अर्थात स्ट्रेस टॉईज बाजारात उपलब्ध आहेत. स्ट्रेस टॉईजचा आकार खूप लहान असतो. त्यामुळे ही खेळणी मुठीमध्ये सहज मावतात. मानसिक ताणाबरोबरच शारीरिक त्रासही या खेळण्यांमुळे हलका होतो
स्ट्रेस टाॅय
स्ट्रेस टाॅयEsakal

तरुणाईचे अवघे आयुष्य तणावाने घेरले आहे. ताण हलका करण्यासाठी तरुणाई स्ट्रेस टॉईजचा वापर करू शकते. स्ट्रेस टॉईज Stress Toys हातात घट्ट धरून ठेवल्याने मनावरचा आणि स्नायूंवरचा ताण कमी होतो. Use Stress Toys to be Healthy tips for young generation

सततची धावपळ, कामाचा ताण, मानसिक आणि शारीरिक आरोग्यातील चढ-उतार या सगळ्याचा परिणाम तरुणाईच्या Young Generation आरोग्यावर होत असतो. ताणतणावाने तर तरुणाईचे जीवनच व्यापले आहे. एक मर्यादा ओलांडली की हा ताण Stress सहन होत नाही आणि आयुष्यच विस्कळित होते. या सर्वांवर उपाय म्हणून तरुणाई काही उपाय योजू शकते. ताण Tensions हलका करण्यासाठी तरुणाईला खेळण्यांचा उपयोग होऊ शकतो.

आता तुम्ही म्हणाल, हा काय पोरकटपणा? आम्ही कसे खेळणी वापरणार? पण, यात तथ्य आहे. तरुणाईचा ताण हलका करणारी खेळणी अर्थात स्ट्रेस टॉईज बाजारात उपलब्ध आहेत. स्ट्रेस टॉईजचा आकार खूप लहान असतो. त्यामुळे ही खेळणी मुठीमध्ये सहज मावतात. मानसिक ताणाबरोबरच शारीरिक त्रासही या खेळण्यांमुळे हलका होतो.

स्ट्रेस टाॅईजचे प्रकार

प्रमाणापेक्षा जास्त काम झाले की स्नायूंवर ताण येतो. स्ट्रेस टॉईजच्या साह्याने हा ताण हलका होतो. स्ट्रेस टॉईज वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये आणि आकारांमध्ये उपलब्ध असतात. त्यामध्ये अनेकविध आकार पाहायला मिळत असले, तरी बहुतांश पसंती गोल आकारालाच असते. यांना स्ट्रेस बॉलही म्हटले जाते. बॉलशिवाय प्राणी, पक्षी, फळे, कार्टून कॅरॅक्टर्स, वाहने असे आकारही स्ट्रेस टॉईजमध्ये पाहायला मिळतात.

हे देखिल वाचा-

स्ट्रेस टाॅय
Relationship Stress झटक्यात दूर करेल या सोप्या ट्रिक्स

कशी वापरावीत स्ट्रेस टाॅईज-

स्ट्रेस टॉईज फोन, सॉफ्ट रबर, पॉलियुरथेन असा सॉफ्ट मटेरियलमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे हातांना आराम मिळतो आणि ताण दूर होतो. ताण हलका करण्यासाठी स्ट्रेस टॉईज हातामध्ये घट्ट पकडावीत. खेळणे स्नायूच्या संपर्कात येताच शिथिल होतात आणि आराम मिळतो. खेळणे हातात असताना दीर्घ श्वास घेतला तर जास्त फरक जाणवतो.

ताण हलका करण्याचा हा प्रकार बऱ्याच काळापर्यंत उपयोगी पडतो. स्ट्रेस टॉईजमुळे तणावावरून लक्ष इतरत्र वेधले जाते. त्यामुळे डोके शांत राहते आणि एकाग्रता वाढते. खेळण्यांमुळे

रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे हानिकारक आणि विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात आणि रक्त शुद्ध होते.

स्ट्रेस टॉईजमुळे हातांमधील नसा उत्तेजित होत असल्याने ताण लवकर हलका होतो. चायना अॅक्युप्रेशर तंत्रज्ञानाचाच उपयोग स्ट्रेस टॉईजमध्ये केला जातो. खेळण्यांमुळे मेंदूतील एन्ड्रोपिन या संप्रेरकाची पातळी वाढते. एन्ड्रोपिन हॅपी हॉर्मोन या नावानेही ओळखले जाते. या संप्रेरकाची पातळी वाढल्याने मन उत्साही आणि प्रसन्न मिळते. स्ट्रेस टॉईजची किंमत खूप कमी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com