esakal | झटपट फॅट बर्न करण्यासाठी रूटीन मध्ये वापरा 'या' 5 टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

झटपट फॅट बर्न करण्यासाठी रूटीन मध्ये वापरा  'या'  5 टिप्स

व्यायामामध्ये आळस करणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. जर तुम्हालाही या समस्या असतील तर मग या 5 फिटनेस रूटीनकडे लक्ष द्या

झटपट फॅट बर्न करण्यासाठी रूटीन मध्ये वापरा 'या' 5 टिप्स

sakal_logo
By
अर्चना बनगे

व्यायाम करणे नक्कीच सोपे नाही. जरी आपण पहिल्या दिवशी उत्साहाने व्यायाम करतो. परंतु त्यानंतर हात-पाय दुखू लागतात.नक्कीच, व्यायामाची दिनचर्या बनविणे खूप कठीण काम आहे. आणि जर कोणी व्यायामासाठी फारच आळशी असेल तर ते आणखी कठीण होते. मात्र या आळशीपणामुळे, चरबी खूप वाढते.आज आम्ही तुम्हाला अशा पाच व्यायामाच्या नियमांविषयी सांगणार आहोत जे अशा लोकांसाठीही खूप चांगले आहेत ज्यांना व्यायाम करायला आवडत नाही. मात्र त्यांच्या चरबीच्या समस्येमुळे ते त्रस्त आहेत. (use-these-5-tips-in-your-routine-to-burn-fat-instantly-marathi-news)

1. वॉकिंग वर्कआउट

एक्सरसाइज करत असताना आळस येतो. कारण यासाठी शरीर खूप लवचिक बनवावे लागते. अशावेळी तुम्ही वॉकिंग वर्कआउट करू शकता. जर तुम्ही विचार करत असाल की, यामुळे वजन कमी होईल की नाही. पण हार्वर्ड विद्यापीठाच्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, दररोज 30 मिनिटे चालत राहिल्यास तुमचा मेटाबॉलिज्म वाढतो. जर तुमचा मेटाबॉलिज्म योग्य असेल तर चरबीची समस्या आपोआप कमी होईल.

काय करायचं?

दररोज 30 मिनिट चालण्यापासून सुरुवात करा.

15 दिवस यात सातत्य ठेवा. नंतर दर आठवड्यात चालायचा कालावधी 5 - 5 मिनिटांनी वाढवा.

हा कालावधी 1 तास होईपर्यंत वाढविणे आवश्यक आहे.

जेव्हा तुम्हाला 1 तास चालून आल्यावर कंटाळा येत नाही, तेव्हा तुमचा स्टॅमिना डेवलप झाला असे समजा. यानंतर तुम्ही ब्रिस्क वॉक ला सुरुवात करा. या स्टेजवर आपल्या चालण्याची वेळ वाढवू नका,तर आपल्या चालण्याची गती वाढवा. फॅट लॉस करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे सिद्ध होऊ शकते. आणि आपले लक्ष वेगवेगळ्या गोष्टींवर देखील केंद्रित करेल.

2) दोरी उडी

फॅट लॉस करण्यासाठी दोरी उडी हा एक उत्तम पर्याय आहे. जम्पिंगमुळे प्रत्येक मिनिटाला 5 कॅलरी बर्न होतात.एका संशोधनात असे म्हटले आहे की, केवळ दोरी उडी मारून साधारण व्यक्ती 200-300 कॅलरी बर्न करू शकते

काय करायचं?

दररोज 10 मिनिटे दोरी उड्या मारण्यापासून सुरवात करा. जर 10 मिनिटे जास्त वाटली तर 25-25 च्या सेटमध्ये किमान 75 वेळा दोरी उड्या मारा.

हे आपणास कमी वाटेल परंतु आपण प्रथमच जंपिंग दोरीने सुरुवात करत असाल तर हे फार दमवणारा असेल.याला हळू- हळू 10 मिनिटांपासून सुरुवात करा.

थकल्याशिवाय हे करण्यास तुम्हाला 8-10 दिवस लागू शकतात.यानंतर, पुढील एका आठवड्यातच ते 15 मिनिटांपर्यंत वाढवा.

जर आपण चरबी बर्न ऐवजी तंदुरुस्त राहण्यासाठी दोरी उडी मारत असाल तर 15 मिनिटे पुरेसे आहेत.

तुम्ही हळूहळू 30 मिनिटे नेऊ शकता.तुम्हाला थोड्या दिवसात जाणवेल की, लेग, बॅक, आर्म टोन सोबत पोटातील चरबी देखील कमी होत आहे.

3) गाणे एेकत धावण्याचा प्रयत्न करा-

संगीत आपल्याला उत्तेजीत करते. ही एक साइंटिफिक फॅक्ट आहे. तुम्ही घरी स्वत: च्या जागेवर चालणारी सूडो करू शकता किंवा ट्रेडमिलवर किंवा उद्यानात किंवा रस्त्यावर चालवू शकता. धावण्याचा सराव करताना,गाणे एेकत सराव करा. एखादे गाणे पूर्ण होईपर्यत धावण्याचा सराव करा.

काय करायचं?

सुरुवात 10-15 मिनिटे पासून करा. धावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वेळेनुसार धावा अंतरनुसार नाही.

जर तुम्ही 10-15 मिनिटांपर्यंत धावू शकत असल्यास उद्यान किंवा आपल्या घराजवळील ब्लॉक भोवती फेरफटका मारा.

हळूहळू स्टॅमिना वाढवा आणि 30-40 मिनिटे धावण्याचा प्रयत्न करा. आपल्या चरबीला लोणीप्रमाणे वितळवण्यासाठी हे पुरेसे असेल.

प्लैंक

प्लैंक लावण्याचा फायदा हा आहे, की बेली फॅट ची समस्या लवकर बरे करतो .आणि बर्‍याच स्नायूंमध्ये एकाच वेळी कार्य करतो. आपण यात बऱ्याच प्रकारचे वेरिएशन ट्राय करू शकता. संपूर्ण वर्कआउट रूटीन आपल्या शरीराची चरबी अगदी सहज वितळेल.

काय करायचं?

सुरुवात 20 सेकंदापासून करा.

यानंतर कालावधी वाढवा आणि हळूहळू 5 मिनिटे घ्या.

संपूर्ण शरीराला टोन देण्यासाठी हा एक चांगला व्यायाम असू शकतो.

उभे राहने

ज्यांना वर दिलेला कोणताही व्यायाम करण्यास आवडत नसेल तर त्यांनी दिवसातून फक्त 1 तास उभे राहिल्यास पुरेसे आहे. आपण ऐकले असेल की दिवसभर बसून राहण्याने खुप नुकसान होते. आणि तरीही आपल्याला इतर कोणताही व्यायाम करायचा नसेल किंवा आपल्याला वेळ नसेल तर आपण कमीतकमी 1 तास उभे राहण्याची सवय लावली पाहिजे.

काय करायचं?

दर 15 मिनिटांनी उभे रहा. आपण दर 15 मिनिटांनी उभे राहून आपल्या घराची, बागेत किंवा रस्त्याची फेरी मारून येऊ शकता.

यानंतर, एकावेळी 15 मिनिटे सतत उभे राहण्याची सवय लावा.

हा कालावधी 1 तास होईपर्यंत 5 ते 5 मिनिटांसाठी वाढवत ठेवा.

आपल्याला व्यायाम करायला आवडत नसेल तर या सर्व टिप्स वापरुन पहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

loading image