त्वचा ग्लोईंग आणि उठावदार दिसण्यासाठी तुळस फायदेमंद

use of tussock for skin and helpful to health for women in kolhapur
use of tussock for skin and helpful to health for women in kolhapur

कोल्हापूर : संस्कृतमध्ये तुळशीचा अर्थ आहे अतुलनीय आणि हा योग्य आहे. तुळसला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. शरीरासाठी इतर काही आवश्यक असलेल्या जडी बुटीमध्ये याचाही फायदा होतो. तुमची पचन क्रिया उत्तम ठेवण्यासाठी तसेच अन्य काही समस्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्यास मदत होते. फक्त आरोग्यासाठी तुळस फायद्याचे आहे असं नाही ही तुमच्या त्वचेलाही स्वस्थ ठेवण्यास मदत करते. तुळशीची पाने खाल्ल्याने तुमच्या स्किनला ग्लो येतो तसेच त्वचेच्या अनेक समस्यांपासून दूर राहतात. 

त्वचेचा रंग उजळण्यासाठी उपयोग 

त्वचेचा रंग उजळण्यासाठी तुळशीची मदत होते. तुळस तुमच्या त्वचेला क्लीन करते. तुम्ही याला दुधात मिक्स करूनही लावू शकता त्यामुळे तुमची स्कीन उठावदार दिसेल. तसेच तुळशीचा फेस पॅक बनवण्यासाठी दुधासोबत समान मात्रात तुळशीची काही पाने एकत्र पिसुन घ्या. त्याची पेस्ट करून चेहरा आणि    मानेला लावल्यास वीस मिनिटे ठेवू शकता. याला नंतर स्वच्छ करु शकता. यामुळे त्वचेला निखार चढतो. 

केसातील कोंडापासून सुटकारा

आपल्यापैकी बरेच लोक केसात होणाऱ्या कोंडामुळे त्रस्त असतात. परंतु तुळशीचे छोटे-छोटे पाणी यावर उपयोगी पडू शकतात. तुळशीच्या पानांचा वापराने तुम्ही हेअर मास्क तयार करु शकता. यासाठी तुळशीची पाने, अर्धा कप आवळा पावडर आणि थोडेसे पाणी घेऊन ब्लेंडर मध्ये एकत्र करू शकता. या पेस्ट बनवून तीस मिनिटांसाठी तुम्ही पेस्ट केसांना लावली आणि त्यानंतर शॅंम्पू किंवा कंडीशनर लावून ते स्वच्छ केल्यास डेंड्रफपासून सुटकारा मिळवता येतो. हा मास्क डेंड्रफपासून सुटकारा यावर प्रभावी उपाय वापरू शकता

चेहऱ्यावरील पिंपल दूर करण्यासाठी 

तुम्ही तुमच्या स्क्रीन रुटीनमध्ये तुळशीला सामील करून घेऊ शकता. चेहऱ्यावरील डागांपासून सुटकारा मिळवू शकता. तुळशीचे अॅंटी बॅक्टरियल आणि फंगलचे गुणांचे प्रमाण थांबवायला मदत करते. घरामध्ये  अॅंटी एक्ने फेस मास्क तयार करण्यासाठी तुळशी आणि लिंबाचे पाणी घेऊन त्यांना बारीक करून त्याची पेस्ट बनवल्यास आणि त्यात ताज्या लिंबूचा रस घालून याची पेस्ट करु शकता. चेहऱ्यावरील पिंपलनां लावल्यानंतर धुतल्यावर चेहरा साफ केल्यास फरक जाणवतो. 

स्किनला साफ करा 

पर्यावरणातील प्रदूषणामुळे गरमी, धूळ यांमुळे स्कीनला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा स्किनला स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्वचेचे अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. त्वचा साफ ठेवण्यासाठी एक मुठ तुळशीचे पाने पिसून घ्या. त्यामध्ये अंड्याचा सफेद भाग घालून ती पेस्ट करून घ्या आणि चेहऱ्यावर लावल्यास दहा-पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com