चेहऱ्याची त्वचा कोमल ठेवण्यासाठी पाच मातीचे प्रकार करतील मदत

use of various soil for increase face beauty in kolhapur
use of various soil for increase face beauty in kolhapur

कोल्हापूर : माती म्हटल्यानंतर आपल्याला त्याची जास्त उपयोगीता जाणवत नाही. परंतु, पूर्वीच्या काळी या मातीचा ओैषधासाठी वापर करत होते. अलिकडेही या मातीला परत महत्व आले आहे. पूर्वीच्या काळी ज्वालामुखी फुटल्यानंतर राख आणि झाडांपासून ही माती तयार झाली. ही मीती कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन आणि सिलिकापासून समृद्ध होत असते. मानवी त्वचेच्या छिद्रांमध्यील घाण काढण्याची ताकद याच मातीमध्ये आहे. त्वचेची अॅलर्जी आणि सुर्याच्या अतिनिल किरणांपासून संरक्षण करण्यासाठीही माती मदत करते. माती त्वचेचा तेलकटपणा संतुलित करते. माती अनेक प्रकारची असते. ती त्वचेच्या अनेक आजारांवरही उपयोगी पडते.  
 

मुलतानी माती

मुलतानी माती एक प्रकारे शरीसासाठी वरदानच आहे. ही माती गुलाबाच्या पाण्यात मिसळून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि हायपरपिग्मेंटेशनपासून मुक्तता देते. मुलतानी माती काही लोकांसाठी ड्राय पण असू शकते. परंतु, योग्य प्रकारे याचा वापर केल्यास त्वचेसाठी फायदा होईल. आठवड्यातून एकदा या मातीचा वापर करायला काही हरकत नाही. 

 
बेंटोनाइट माती

ही माती पण त्वचेच्या उपचारासाठी लोकप्रिय आहे. ही माती पाण्यात मिसळल्यानंतर त्यातून फॉसफ्सरसमध्ये बदलली जाते. बेंटोनाईट आपल्यातील द्रव्यमानातून अधिक पदार्थांची निर्मिती करते. त्यामुळे ही माती शरीरावरील सुज कमी करण्यास मदत करते.  
 

चीनी माती

चीनी माती अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. पांढरी, गुलाबी, लाल, पिवळी असे अनेक रंगांत ही माती असते. यातील पांढरी माती संवेदनशील आणि नाजूक त्वचेसाठी उपयोगी असते. त्वचेवरील घाण काढण्यासाठी लाल मातीचा उपयोग केला जातो. 
 
 रासुल माती

ही माची त्वचेसह केसांसाठीही उपयोगी आहे. यात जास्तीत जास्त खनिजांचा समावेश असतो. त्यामुळे केस काळे होण्यासह चेहऱ्यावरील घाण घालवण्याची क्षमता या मातीत असते. चेहऱ्याची नाजूकता सांभाळून ठेवण्यासह स्ट्रक्चर सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. शिवाय केसांना चमकदार ठेवण्यास या मातीचा उपयोग होतो. 


फ्रेंच ग्रीन माती 

या मातीला समुद्रि माती म्हटले जाते. या मातीचा रंग हिरवा असतो. शरीरातील घाण वास कमी करण्यासाठी या मातीचा वापर केला जातो.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com