Valentine Day 2024 : नातं तुझं माझं; नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा कसा दूर करावा?

नात्यात प्रेम आणि गोडवा टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले पाहिजेत
Valentine Day 2024
Valentine Day 2024esakal

Valentine Day 2024 :

कोणत्याही नात्याची सुरूवात खूप सुंदर होते. मग ते पती-पत्नीचे असो वा प्रियकर प्रियसीचे किंवा मैत्रीचे. नात्याची सुरुवात खूप सुंदर होते, परंतु काहीवेळा जोडप्यांना नाते सांभाळणे कठीण होऊन बसते. अनेकवेळा हे नाते असे वळण घेते की जोडप्यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागते. आपण काही गोष्टींचे पालन केल्यास, संबंध अधिक दृढ होतील आणि दीर्घकाळापर्यंत चांगले कार्य करत राहतील.

नात्यात प्रेम आणि गोडवा टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले पाहिजेत. कधी-कधी किरकोळ भांडणेही इतकी वाढतात की नातं कमकुवत व्हायला लागतं. पती-पत्नीच्या नात्यात जिव्हाळा राखणे खूप गरजेचे आहे. नात्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढतात. 

Valentine Day 2024
Valentine Day 2024 : ‘गिटार वादकाशी लग्न करण्यासाठी मी घरच्यांच्या होकाराची १० वर्ष वाट पाहिली’

जर तुम्हाला तुमचे एकमेकांशी असलेले नाते आणि मैत्री मजबूत ठेवायची असेल तर या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते सुधारू शकता. 

एकमेकांचे विचार ऐकून घ्या

हे आवश्यक नाही की तुमचा पार्टनर तुम्हाला जसा विचार करतो तसाच विचार करतो. दोघांच्या विचारात फरक असू शकतो. अनेकवेळा यावरून जोडप्यांमध्ये भांडणेही होतात. अशा वेळी एकमेकांचे ऐका आणि मग एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाते घट्ट करण्यासाठी ऐकणे आणि समजून घेणे गरजेचे आहे.

तुम्ही एकमेकांशी गप्पा मारून, बोलून मस्त मजेत आयुष्य जास्त जगाल. आणि एकमेकांशी भांडून संसार पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही. त्यामुळेच एकमेकांसोबत जितकं फ्रि आणि राहता येईल तितकं रहा. तरच नातं सुधारेल.

Valentine Day 2024
Valentine Week : व्हॅलेंटाईन स्पेशल पिझ्झा, पिझ्झा बघूनच जोडीदार म्हणेल ‘Dear, I Love You’

जोडीदाराकडून अवाढव्य अपेक्षा ठेवणे

आजकाल जोडप्यांमध्ये वारंवार वाद होतात, ज्यामुळे नात्यात दुरावा देखील येऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा ठेवणे.

आपल्या सर्व गरजा जोडीदाराकडून पूर्ण होतील अशी अनेकदा भागीदारांची अपेक्षा असते. तथापि, सत्य हे आहे की एका व्यक्तीला आपल्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण करणे शक्य नाही.

अशा परिस्थितीत आपण आपल्या गरजा पूर्ण करण्याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या जोडीदाराला सहमती देण्यास भाग पाडणे देखील चुकीचे आहे.

Valentine Day 2024
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

जोडीदाराचे गुण-दोष स्विकारा

नाते मजबूत करण्यासाठी, आपण आपल्या जोडीदाराच्या सर्व जुन्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. तुम्ही असे न केल्यास, तुमच्या दोघांमध्ये वारंवार वाद होतात. अशा स्थितीत नेहमी तुमच्या जोडीदाराचा भूतकाळ स्वीकारा आणि पुढे जा.

Valentine Day 2024
Relationship Tips : उधार पैसे देऊन तुम्ही घाईला आलाय? अशा लोकांना टाळायला ही कारणं उपयोगी पडतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com