Teddy Day 2026: टेडी बिअर गिफ्ट करताय? ‘या’ रंगांचा अर्थ आधी जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होऊ शकतो!

Teddy Day 2026: दरवर्षा १० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी गिफ्ट करतात. तसेच त्यांच्या भावना व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक टेडी बिअरचा रंग वेगळे संकेत देतो. यामुळे जोडीदाराला टेडी बिअर गिफ्ट करतांना योग्य रंग निवडा.
teddy bear color meanings

teddy bear color meanings

esakal

Updated on

Teddy Day 2026 teddy bear color meanings: टेडी डे हा व्हॅलेंटाईन वीकमधील सर्वात गोड आणि भावनिक दिवस मानला जातो. या दिवशी जोडीदाराला टेडी बिअर गिफ्ट देऊन प्रेम, आपुलकी आणि काळजी व्यक्त केली जाते. मात्र, अनेकांना हे माहित नसतं की टेडी बिअरचा रंगही तुमच्या भावना आणि नात्याबद्दल खास संकेत देतो. चुकीच्या रंगाचा टेडी दिल्यास कधी कधी गैरसमज निर्माण होऊ शकतो. लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा किंवा तपकिरी प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो. काही रंग प्रेम आणि रोमान्स दर्शवतात, तर काही मैत्री, विश्वास किंवा क्षमाशीलतेचा संकेत देतात. त्यामुळे Teddy Day 2026 निमित्त टेडी बिअर गिफ्ट करण्याआधी त्या रंगामागचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. योग्य रंगाची निवड केल्यास तुमचा संदेश अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे जोडीदारापर्यंत पोहोचतो, आणि हा खास दिवस अधिक गोड व संस्मरणीय बनतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com