
शलाका तांबे
काल व्हॅलेंटाइन होता. बहुतेक आपण सर्वांनीच तो साजरा केला असेल. हा आपल्या प्रियजनांवर असलेले आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या प्रियजनांच्या यादीमध्ये, आपण आपल्या आवडत्या व्यक्तींचा समावेश करू शकतो, आणि आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे खास या दिवशी त्यांना आवर्जून सांगू शकतो. मग या यादीमध्ये आपण स्वतःलाही धरतो का? आणि खासकरून आपण महिला, हे करतो का?