Valentines Day 2024
Valentines Day 2024esakal

Valentines Day 2024 :'व्हॅलेंटाईन डे' च्या नाईट डेटला परफेक्ट दिसायचय? मग,स्टायलिंग करताना अशी घ्या काळजी

अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Published on

Valentines Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. यालाच व्हॅलेंटाईन वीक असे म्हटले जाते. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे, चॉकलेट डे, प्रपोझ डे, प्रॉमिस डे इत्यादी प्रकारचे दिवस साजरे केले जातात.

कोणतीही पार्टी असो किंवा कार्यक्रम त्यासाठी जाताना महिला त्यांच्या लूकची खास काळजी घेतात. अगदी कपड्यांच्या निवडीपासून ते चांगल्या प्रकारे स्टाईल करण्यापर्यंत योग्य काळजी घेतली, तर तुमचा लूक परफेक्ट दिसतो. 'व्हॅलेंटाईन डे' च्या नाईट डेटसाठी तुम्हाला परफेक्ट दिसायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Valentines Day 2024
Valentines Day 2024 : पहिल्यांदाच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताय? मग, महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

आऊटफीटची निवड कशी करायची?

व्हॅलेंटाईन डे च्या नाईट डेटवर जाताना तरूणींना वेस्टर्न आणि मॉर्डन आऊटफीटची निवड करायला आवडते. तुम्ही या स्पेशल दिवसासाठी नेहमीच्या रेड आऊटफीटची निवड करण्यापेक्षा जांभळा, ब्लॅक आणि गुलाबी रंगांच्या आऊटफीटची निवड करू शकता.

या रंगांमधील कोऑर्ड सेट्स किंवा वनपीस अगदी शोभून दिसतील. यात काही शंका नाही. या स्पेशल नाईट डेट लूकसाठी डार्क आणि शायनी रंगांचे कपडे निवडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा लूक स्टायलिश दिसण्यास मदत होईल.

डेट नाईट लूकसाठी हेअरस्टाईल आणि मेकअप

आऊटफीटची योग्य प्रकारे निवड केल्यानंतर त्यावर तुम्ही चांगला मेकअप आणि हेअरस्टाईल करणे महत्वाचे आहे. जर या गोष्टी चुकल्या तर तुमचा लूक पूर्णपणे बिघडू शकतो. त्यामुळे, हा लूक परफेक्ट करण्यासाठी केसांची छान हेअरस्टाईल आणि मेकअप करण्यावर भर द्या.

या व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेटसाठी तुम्ही मेसी किंवा बन हेअरस्टाईल करू शकता. यासोबत केस मोकळे देखील ठेवू शकता. मेकअप जास्त भडक करणे शक्यतो टाळा. ग्लॉसी आणि मिनिमल मेकअप करायला विसरू नका. मग, बघा तुमच्या लूकला कसे चारचाँद लागतात ते. या दोन्ही गोष्टी चांगल्या जमून आल्या की, तुमचा लूक परफेक्ट दिसेल.

त्यामुळे, व्हॅलेंटाईन डे च्या स्पेशल नाईट डेटसाठी तयार होताना या गोष्टींची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका.

Valentines Day 2024
Valentine Day 2024 : प्रेमापुढे वय देखील झुकले, वाचा ‘या' फिटनेस फ्रीक कपलची चिरतरूण लव्हस्टोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com