Vastu Tips: घरात डायनिंग टेबल कोणत्या दिशेला असावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

Vastu Tips: घरात डायनिंग टेबल कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेऊया.
Vastu Tips For Dining Table
Vastu Tips For Dining TableSakal

vastu tips dining table should kept these side according to vastutips

वास्तूशास्त्रात घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्याने घरात सुख-शांत राहते. वास्तुशास्त्रात डायनिंग टेबलसाठी देखील काही नियम सांगतिले आहे. घरामध्ये कोणत्या दिशेला आणि कोणत्या आकाराचा डायनिंग टेबल असावा हे जाणून घेऊया.

  • स्वयंपाकघर

डायनिंग टेबल स्वयंपाकघराजवळ असेल पाहिजे. यामुळे जेवण करताना सकारात्मक वातावरण राहते. डायनिंग रूम दक्षिण, पश्चिम किंवा पूर्व दिशेला स्वयंपाकघराशी जोडलेली असावी.

  • मुख्यप्रवेश द्वार

कधीही टायनिंग टेबल घरातील मुख्य दाराजवळ नसावे. वास्तुनुसार डायनिंग टेबल चुकूनही मुख्य दाराजवळ किंवा गेटजवळ ठेवू नका. या ठिकाणी जेवणे अशुभ मानले जाते.

  • फोटो

डायनिंग टेबलच्या सभोवताली फळ किंवा भाज्या, निसर्गदृश्ययासारखे फोटो लावू शकता. यामुळे जेवण करताना आनंदी वातावरण राहते. डायनिंग रूममध्ये चुकूनही हिंसक फोटो लावू नका.

  • रंग

वास्तुनुसार डायनिंग रूमचा रंग केशरी असावा. हा रंग शक्ती, अध्यात्म, आनंद याचा प्रतिक आहे.

Vastu Tips For Dining Table
World Health Day 2024: स्वतःसाठी दररोज एक तास द्या, निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांचा सल्ला
  • पश्चिम दिशा

वास्तूनुसार घरातील डायनिंग टेबल ठेवण्यासाठी पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय डायनिंग टेबल दक्षिण-पूर्व दिशेलाही ठेवणे शुभ मानले जाते.

  • दक्षिण दिशा

वास्तूशास्त्रानुसार डायनिंग टेबल चुकूनही दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवू नका. दक्षिणेकडे तोंड करून जेवण केल्याने आजारी पडू शकता. तसेच जेवण नेहमी मोकळ्या जागेत असावे.

  • योग्य प्रकाश

डायनिंग टेबलवर जेवण करताना योग्य प्रकाश असला पाहिजे. यामुळे जेवण करताना आनंदी आणि सकारात्मक वातावर राहते.

  • आकार

वास्तुनुसार डायनिंग टेबल गोलाकर नसावा. सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी डायनिंग टेबलचा आकार चौरस किंवा आयताकृती असावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com