Vastu Tips : वास्तूनूसार घरात कोणत्या दिशेला कोणती झाडे लावावीत?

तुळशीचे रोप हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते
Vastu Tips
Vastu Tipsesakal

Vastu Tips :  जगभरात प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रदूषणासोबतच ग्लोबल वॉर्मिंगचाही धोका आपल्याला भेडसावत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सततची झाडे तोडणे होय. झाडे लावल्याने घरातील वातावरण तर सकारात्मक राहतेच शिवाय घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्यही चांगले राहते.

आज आपण अशाच काही झाडे आणि वनस्पतीबद्दल सांगणार आहोत जे वास्तुशास्त्रानुसार घरात लावणे खूप शुभ आहे. ही झाडे आणि झाडे लावल्याने घरात सकारात्मकता तर येतेच शिवाय घर सुंदरही होते.आज आपण वास्तूनुसार अशा काही उपयुक्त झाडे घरात कोणत्या दिशेला लावावीत, याबद्दल माहिती घेऊयात.  

Vastu Tips
Spirulina Plant Benefits : मधुमेहाच्या रूग्णांनी खाल्लीच पाहिजे ही भाजी; औषधांपेक्षाही ठरतेय गुणकारी!

वास्तूनुसार झाडे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतात. आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. वास्तू वनस्पती उर्जेचा प्रवाह आणि संतुलन राखण्यास मदत करतात. काही वास्तु वनस्पती आरोग्य सुधारण्यास देखील मदत करतात.

वास्तू शास्त्रानुसार घरात लावलेली झाडे राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करतात. कारण, झाडे लावणे हे सगळ्यांना माहितीय पण ती कोणत्या दिशेला लावावीत याबद्दल फारशी माहिती नाही.

प्लांट्स योग्य ठिकाणी, वास्तूनुसार ठेवली नाहीत. तर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि दुर्दैव आकर्षित होऊ शकतात.

Vastu Tips
Antidiabetic Plants : मधुमेह रोखण्याचे सामर्थ्य चारशे वनस्पतींमध्ये

सर्वात आधी आपण घरात कोणती झाडे लावावीत? याबद्दल माहिती घेऊया.

लव्हेंडर

लॅव्हेंडरचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असतो. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे मनाला शांती मिळते आणि तणाव दूर होण्यास मदत होते. ही वास्तु वनस्पती सकारात्मकता आणते आणि मन शांत करते.

लिलीपीस

लिली प्लांट हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. बेडरुममध्ये ठेवल्याने चांगली झोप येते आणि भयानक स्वप्ने दूर होतात. जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुमच्या खोलीत लिलीचे रोप ठेवणे खूप उपयुक्त ठरू शकते. तुमच्या बेडरूममध्ये शांततेचे स्वागत करण्यासाठी ही वास्तू वनस्पती खिडकीवर ठेवा.

लॅव्हेंडरचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असतो
लॅव्हेंडरचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असतोesakal

स्नेक प्लांट

स्नेक प्लांट सकारात्मक उर्जेचा स्रोत आहे. खिडकीजवळ ठेवल्यास ते ऑक्सिजन घेते आणि खोलीतील वातावरण थंड करते. असेही मानले जाते की ते खोलीच्या आतून हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्त होते.

तुळस

तुळशीचे रोप हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. ते तुम्हाला प्रत्येक घरात दिसते . तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण त्याची पाने घरात ऑक्सिजन पसरवण्याचे काम करतात.

Vastu Tips
Indoor Plants: घरात लावा ही इनडोअर रोपं आणि घरबसल्या मिळवा सौंदर्य आणि ताजी हवा

झाडे कोणत्या दिशेला लावावीत?

वास्तुशास्त्रानुसार, सकारात्मक ऊर्जा नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा उत्तर-पूर्वेकडून दक्षिण-पश्चिमेकडे वाहते. त्यामुळे उत्तर आणि पूर्वेला लहान झाडे लावावीत जेणेकरुन वाऱ्याच्या आगमनात कोणताही अडथळा येणार नाही.

घराच्या पूर्व दिशेला फुले, गवत आणि हंगामी झाडे लावल्याने घरातील लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही.

पश्चिम-उत्तर कोपऱ्यात सुपारी, हळद, चंदन इत्यादी काही झाडे लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते.

Vastu Tips
Plants for monsoon: श्रावणात घरासमोर लावा ही झाडे; महादेवाची होईल कृपा, घरात येईल सकारात्मकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com