Vastu Tips For Key Holder: घरात कोणत्या दिशेला लावावे की-होल्डर? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Vastu Tips For Key Holder: घरात कोणत्या दिशेला की-होल्डर लावणे शुभ मानले जाते.
Vastu Tips For Key Holder
Vastu Tips For Key HolderSakal

vastu tips for hanging key holder in home

वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी निश्चित जागा दिल्या आहेत. वास्तूमध्ये प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्त्व मानले जाते. दिशांचीही स्वतःची वेगळी ऊर्जा असते आणि त्यामुळे ती दिशा आणि त्यातील ऊर्जा समजून घेऊन वस्तू योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी ठेवल्या तर घरात सकारात्मकता येते. प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. घरात की-होल्डर कोणत्या दिशेला ठेवावे हे जाणून घेऊया. तुमच्या घरात सकारात्मकता कायम राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तूनुसार कि-होल्डर योग्य दिशेला गरजेचे आहे.

  • पश्चिम दिशा

जर तुम्ही तुमच्या घराच्या चाव्या ठेवण्यासाठी की-होल्डर वापरत असाल तर त्यासाठी पश्चिम दिशा खूप चांगली मानली जाते. लोखंड, पितळ किंवा इतर धातूच्या चाव्या की होल्डरमध्ये ठेवल्या जातात आणि लोह आणि धातूसाठी पश्चिम दिशा खूप चांगली असते.

  • ही चुक करू नका

वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक दिशा निश्चित केली जाते आणि ती वस्तू त्याच ठिकाणी ठेवली पाहिजे. पश्चिम दिशा ही शनीची दिशा मानली जाते. जी काम किंवा व्यवसायासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे की-होल्डरची योग्य दिशा घरावर, दुकानात आणि कामावर सकारात्मक परिणाम करू शकते.

Vastu Tips For Key Holder
Vastu Tips: घरात डायनिंग टेबल कोणत्या दिशेला असावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं
  • लाकडी की-होल्डर

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे स्टायलिश होल्डर उपलब्ध आहेत. पण वास्तुनुसार घरात लाकडी की-होल्डर लावणे शुभ मानले जाते. तुम्ही सागवानाचा वापर करू शकता. यामुळे घरात सकारात्मकताही राहते.

  • कापडाचा वापर

चावीला रिंग नसेल तर अनेक लोक चावीभोवती कापड बांधतात. यामुळे चावी की-होल्डवर लटकणे सोपे होते. पण असे करू नका. अनेकांना चावीला हात लावायची सवय असते. यामुळे कापड खराब होऊ शकते. तसेच नकारात्मकता वाढू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com