Vastu Tips : घरातील डस्टबिन चुकीच्या दिशेला असेल तरी येतात पैशांच्या अडचणी, ही गोष्ट बदला फरक पडेल

डस्टबीन या दिशेला कधीच ठेऊ नका
Vastu Tips
Vastu Tipsesakal

Vastu Tips :

सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक आपल्या आयुष्यात अडथळे यायला लागतात. घरी सतत कोणीतरी आजारी असतं. किंवा घरी सतत पैशांच्या अडचणी यायला लागतात. तेव्हा घराचं वास्तूशास्त्र तपासण्याचा सल्ला दिला जातो.

वास्तुशास्त्र हे असे नियम आहेत. जे आपल्याला आपले भविष्य सुधारण्यास मदत करू शकतो. आपल्या घरातील गोष्टी कशा व्यवस्थित करायच्या हे सांगते.

जर आपल्याला पैशाची समस्या असेल तर ते सोडवण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपाय सांगते. त्यात म्हटले आहे की, जर आपण गोष्टी चुकीच्या दिशेने ठेवल्या तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Vastu Tips
Vastu Tips : या झाडाची पाने तोडा अन् कपाटात ठेवा, विश्वास बसणार नाही असा चमत्कार घडेल, प्रयोग करून तर पहा

या दिशेला ठेऊ नका

आपण चुकीच्या ठिकाणी डस्टबिन ठेवल्यास लक्ष्मी देवी कोप होतो. आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रानुसार, आपण आपल्या घरात डस्टबिन कुठे ठेवावे? जाणून घेऊया. वास्तु सल्लागार दिव्या छाबरा सांगतात की, घरातील डस्टबिन कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये.

कारण इथे देवाचा वास आहे. यामुळे घरात गरिबी येते. तुमचे चालू असलेले कामही बिघडते. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की घराच्या पूर्व किंवा उत्तर भागात डस्टबिन ठेवल्याने घरात राहणाऱ्या लोकांना दुःख होते आणि त्यांची प्रगती थांबते. यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी मिळणेही कठीण होऊ शकते.

त्यामुळे चुकूनही कचऱ्याच्या डब्ब्याची जागा ईशान्य कोपऱ्यात करू नका. त्याऐवजी घराबाहेर कचऱ्याचा डबा असेल तर घरात प्रदुषणही होत नाही.

Vastu Tips
Vastu Tips : घरात नकारात्मक उर्जा अन् वास्तू दोष आहेत की नाही, हे कसे ओळखावे?

कुठे ठेवावा कचऱ्याचा डब्बा

डस्टबिन नेहमी घराबाहेर ठेवा. त्यामुळे अनावश्यक खर्चास प्रतिबंध होतो. घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहते. वास्तुशास्त्रात डस्टबिन ठेवण्याची उत्तम दिशा नैऋत्य किंवा उत्तर-पश्चिम मानली जाते. विसर्जनासाठी नैऋत्य दिशा चांगली मानली जाते, त्यामुळे डस्टबिन याच दिशेला ठेवणे चांगले.

Vastu Tips
Kitchen Vastu Tips: स्वयंपाक घराची योग्य जागा कोणती? स्वयंपाक करताना कोणते नियम पाळावेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com