
तेजश्री प्रधान चाळीशीतही निम्म्या वयाची दिसते, तिच्या नैसर्गिक स्किन केअर उपायांमुळे.
तिने तिच्या फिटनेस आणि चमकदार त्वचेच रहस्य सांगितल आहे.
स्वत:ची काळजी घेण्याच्या तिच्या पद्धती चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
Tejashri Pradhan Skin Care Routine : मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या तरुण आणि टवटवीत दिसण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 'अग्गं बाई... सासूबाई' या मालिकेतील 'शुभ्रा'च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली तेजश्री 37 वर्षांची झाली असूनही तिशीच्या आत दिसते. तिच्या या चमकदार त्वचेचं आणि फिटनेसचं रहस्य तिने नुकतेच चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.