Viral | खात्री देतो ‘हा’ व्हिडिओ पाहून तूमच टेंशन होणार छुमंतर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral elephant

Viral : खात्री देतो ‘हा’ व्हिडिओ पाहून तूमच टेंशन होणार छुमंतर!

पुणे : आपले असो वा एखाद्या प्राण्याचे बाळ पाहीले की मन प्रसन्न होते. कधी-कधी सोशल मीडियावर असे व्हिडिओज वायरल होतात की ते पाहून कुणाचेही मन प्रसन्न होते.

असाच एक व्हिडिओ सध्या खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये हात्तीचे एक पिल्लू फुटबॉल खेळत आहे. दिवस संपत आला तरी तूम्हाला आजचा दिवस स्पेशल नाही असे वाटत असेल तर सोशल मीडीयावर व्हायरल होणारा हा क्युट व्हिडिओ नक्की पह.

व्हायरल व्हिडीओमध्ये पहिल्यांदा हत्तींचा कळप एकत्र फिरताना दिसतोय. त्यातील एक पिल्लू मोठ्या हिरव्या बॉलसोबत मजा करत आहे. तर दुसरीकडे आणखी एक पिलू दोरीने बांधलेला निळा बॉल सोंडेत धरून बागडत आहे.

बॉलसोबत खेळत आहे. हा व्हिडिओ थायलंडमधील एलिफंट नेचर पार्कमधील आहे. आजवर या व्हिडीओला १ लाख हुन अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ कामातून थोडा रिलॅक्स करतो. अशा प्रतिक्रीया काही युजर्सनी दिल्या आहेत. तर, हत्ती अधिक किंमती असल्याचे एका युजरने लिहीले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी पसंत केला आहे. जो सध्या मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे.

टॅग्स :viralviral video