
Viral फोटोमध्ये प्रत्येकाला दिसतोय वेगळा नंबर? तुम्ही पाहिला का?
Viral Optical Illusion : कित्येकदा आपण डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी देखील फसव्या ठरू शकतात. ऑप्टिकल एल्यूजन (Optical Illusion Numbers) याचे एक उदाहरण आहे. यामध्ये जसे दिसते तसे नसते, पण आपल्या डोळ्यांना मात्र ते दिसत नाही. यावेळी इंटरनेट व्हायरल होत असलेला फोटो देखील असाच फसवा आहे. या फोटोमध्ये काही नंबर लिहिलेले आहेत. खूप लक्ष देऊन पाहिल्यावर तुम्ही ते वाचू शकतो ते पण बरोबर आहेत की चूक याची काही गॅरंटी नाही.
सोशल मीडियावर हा वेगळा फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांचा डोक चक्रावले आहे. या फोटोमध्ये लिहलेले अचूक नंबर सांगताना कित्येकजण फेल होत आहे आणि जे लोक हे सांगत आहेत त्यांना जीनियस म्हणून उपाधी दिली जात आहे. आता या फोटोला निरखून पाहा आणि सांगा की योग्य नंबर काय आहे?
हेही वाचा: 62 वर्षाच्या महिलेने साडी नेसून सर केलं सर्वात उंच शिखर, पाहा व्हिडिओ
पाहणाऱ्यांचे डोकं चक्रावेल
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक गोलाकार आकृती बनवली आहे. या गोलाकार चक्रामध्ये वेड्या-वाकड्या डिझाईन काळ्या रंगाने बनविल्या आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही जादुई नंबर लपलेले आहे ज्यांने लोकांच्या डोकं भांडावून सोडले आहे. या गोलाच्या आतमध्ये काही नंबर आहेत, ते बहूतेक लोकांना दिसत नाही किंवा त्यांना चूकीचे नंबर दिसतात. या फोटोमध्ये ट्विटरवर @benonwine या अकाऊंटवरून शेअर करून योग्य नंबर विचारला गेला आहे.
कमी लोकांनी दिले योग्य उत्तर
नेहमी अशा डोकं लावावे लागणारं कोडे सोडविण्यासाठी लोक मागे राहत नाही. तमाम लोकांनी या फोटोमध्ये पाहून आपली उत्तर सांगितली आहे. पण बहूतेककरून लोक योग्य उत्तर देत नाही. काही यूजर्स येथे फक्त ३ क्रमांक पाहू शकतात तर काही ६-७ नंबर. खूप कमी लोकांनी योग्य उत्तर दिले आहे. तुम्हाला तुमचे डोकं वापरून उत्तर समजलं असेल पण नसेल समजले तर माहीत करून घ्या. गोलाकार चक्रामध्ये 3452839 हा नंबर दिसत आहे.
Web Title: Viral Optical Illusion Everyone Is Seeing Different Numbers In The Picture You Can Try Once
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..