Viral Video: मैं लवली हो गई यार... विमानतळावर महिलेचा भन्नाट डान्स , नेटकरी म्हणाले ....

Viral Video: अलिकडेच विमानतळावर 'मैं लवली हो गई यार... ' या गाण्यावर डान्स करताना महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoeSakal

Viral Video: सध्या सोशल मिडियावर कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक लोकांना तर कुठेही रिल्स बनवण्याचे वेड लागले आहे. दिल्ली मेट्रोपासून ते मुंबईच्या लोकल ट्रेन किंवा बसमध्ये सुद्धा रिल्स बनवत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये रिल्स बनवणाऱ्या लोकांना डीएमआरसीकडून इशारा देण्यात आला आहे. परंतु लोक रिल्स बनवणे थाबवंत नाहीत. आता अलिकडेच विमानतळावरही या गोष्टी पाहायला मिळत आहेत. अलिकडेच विमानतळावर 'मैं लवली हो गई यार... ' या गाण्यावर डान्स करताना महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

महिलेचा दमदार डान्स

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रभावकर्ता @_sahelirudra_ चा आहे. तिने कोलकाता विमानतळावरील बोर्डिंग गेटसमोर वेटिंग एरियामध्ये 'मैं लवली हो गई यार...' या बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. 'हॅपी न्यु इअर' या चित्रपटामधील हे गाण आहे. मागे बसलेले लोक तिच्याकडे चकित होउन पाहात आहेत. हा व्हिडिओ महिलेने स्वत: शेअर केला असून त्याचे कॅप्शन लिहिले आहे- पडताना वाचवले.

या व्हायरल व्हिडिओवर नेचकऱ्यांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांना तिच्यावर कारवाई करण्यास सांगितले. एका यूजरने कमेंट केली की, 'विमानतळाची अवस्थाही दिल्ली मेट्रोसारखी झाली आहे. किमान विमानतळ सोडा, दुसऱ्याने लिहिले, 'डान्सनंतर,तुम्ही टक लावून पाहणाऱ्या लोकांना कसे हाताळता. हे खूप लाजिरवाणे आहे.'

Viral Video
Viral Video: आशियातील सर्वात उंच धबधबा आहे ड्यूप्लिकेट? चीनी पर्यटकाने असा लावला शोध, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

एका यूजरने विमानतळ प्राधिकरणाला टॅग केले आणि म्हटले, '@aaiofficial कृपया या गोष्टींची नोंद घ्या आणि या मूर्खपणावर त्वरित बंदी घालण्यासाठी काही कठोर नियम लागू करा. कृपया इतर प्रवाशांसाठी शांतता राखा. एकाने सांगितले की, 'इन्स्टाग्रामने अशा रील्सवर बंदी घातली पाहिजे. दुर्दैवाने ते सर्व चुकीच्या आणि अश्लील गोष्टींना प्रोत्साहन देते. दुसरा म्हणाला, 'अशा प्रकारचा मूर्खपणा किमान विमानतळावर तरी सहन करता येणार नाही.'

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका महिलेने विमानतळावर विचित्र डान्स करायला सुरूवात केली होती. मुंबई विमानतळावरील या व्हिडिओमध्ये सलवार सूट घातलेली एक महिला अचानक गर्दीत 'आपका आना...' गाण्यावर डान्स केला होता. आजूबाजूचे लोक चकितच झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com