वॅक्सिंग करण्यापूर्वी या चार गोष्टी मनातून टाका काढून

Before waxing keep these four things in mind kolhapur news
Before waxing keep these four things in mind kolhapur news

कोल्हापूर : शरीरावरील आणि चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत. यामध्येच वॅक्सिंग हा एक पर्याय आहे जो अनेक जण अवलंबतात. परंतु, बरेच जण वॅक्सिंग करताना होणाऱ्या त्रासाला आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांना घाबरतात. तुम्हीही वॅक्सिंगबाबत अनेक गोष्टी ऐकल्या असतील. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत की ज्या वॅक्सिंगबाबत वास्तव आहेत. 

वॅक्सिंगमुळे खूप वेदना होतात

वास्तव - वॅक्सिंगबाबत ही एक बाब कायम बोलली जाते. वॅक्सिंगमुळे केस मुळापासून निघतात. त्यामुळे वॅक्सिंगदरम्यान जास्त वेदना होतात. परंतु, ही प्रक्रिया सांभाळून केली तर या वेदना होत नाहीत. दरम्यान, तुम्ही वॅक्सिंग कधी करता यावरही या वेदना अवलंबून असतात. पीरियड्सच्या आधी किंवा पीरिड्सच्या दरम्यान त्वचा अधिक संवेदनशील असते त्यामुळे या कालावतील वॅक्सिंग केले तर वेदना होतात. त्यामुळे या काळात वॅक्सिंग करणे टाळणेच योग्य ठरेल. 

केस जास्त लांब असतील तरच करा वॅक्सिंग

वास्तव - अनेक महिला केसांची चांगली वाढ झाल्यानंतरच वॅक्सिंग करतात. कारण त्यांना वाढते की केस लांब झाल्यानंतरच वॅक्सिंग करणे योग्य आहे. परंतु, हे खरे नाही. तुमच्या त्वचेचे केस जास्त कमी किंवा जास्त लांब असू नयेत. हे अशासाठी की, त्वचेचे केस खूपच लहाण असले तर वॅक्सिची पकड घट्ट बसत नाही. त्यामुळे मुळापासून केस निघत नाहीत. शिवाय केस जास्त लांब असल्यास वॅक्सिंग करताना जास्त त्रास होईल.  
 
गरोदरपणात वॅक्सिंग करू नका

वास्तव- गरोदरपणात महिला आपल्याला गर्भातील बाळाची अधिक काळजी घेत असतात. याच काळात कोणीही सांगितलेल्या सल्यावर विश्वास ठेवला जातो. काही महिलांचे म्हणणे असते की, गर्भधारणा झाल्यानंतर  वॅक्सिंग करणे योग्य नाही. कारण त्याचा बाळावर परिणाम होईल. परंतु, वास्तव असे नाही तर गर्भधारणेतही वॅक्सिंग करायला काही हरकत नाही. 

वॅक्सिंग केल्याने त्वचेवर वरखडे पडतात

वास्तव - काही महिलांचे मत असते की,  वॅक्सिंगदरम्यान त्वचेला वरखडे पडतात. परंतु, एक चांगला  वॅक्सिंग थेरिपिस्ट  वॅक्सिंग करताना तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटेत असेल की वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेवर वरखडे पडतात तर चांगल्या पार्लरमधून  वॅक्सिंग करून घ्या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com