Astro Tips : वैवाहिक जीवनात मंगळसूत्र घालण्याची 'ही' पद्धत ठरू शकते चुकीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wearing mangalsutra tips astro tips

Astro Tips : वैवाहिक जीवनात मंगळसूत्र घालण्याची 'ही' पद्धत ठरू शकते चुकीची

विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. नवरा आणि बायोकोच्या सुखी संसाराचे हे एक लक्षण मानले जाते. महिलांचे या मंगळसूत्राशी एक अतुट नाते आहे. मंगळसूत्राशिवाय कोणत्याही विवाहित महिलेला अपूर्ण मानले जाते. धर्माशास्त्रात याचा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. मंगळसूत्रातील काळे मोती आणि सोने हे शिव-पार्वतीच्या बंधनाचे प्रतीक मानले जातात. (wearing mangalsutra, astro tips)

मंगळ सुत्रात असणारे काळे मोती हे शिवाचे आणि माता पार्वतीचे सोन्याचे प्रतीक मानले गेले आहे. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध गुरू ग्रहाशी आणि भगवान विष्णूशी आहे. यासोबतच धर्म आणि ज्योतिषशास्त्रात खरेदी, परिधान इत्यादीबाबत काही नियम दिले आहेत.

हेही वाचा: Health : ग्रीन टीमध्ये 'या' दोन गोष्टींचा समावेश करताय ना? वजन कमी करण्यासाठी होईल फायदा

मंगळसूत्र घालण्याचे नियम

पारंपारिक मंगळसूत्रात 9 मणी असतात आणि ते ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. ते दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतात आणि जोडिदाराचे रक्षण करतात. वैवाहिक जीवनाला वाईट नजरेपासून वाचवण्यास हे मनी मदत करतात असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक विवाहित महिलेने मंगळसूत्र परिधान करावे असे शास्त्र सांगते. मंगळसूत्र नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करावे. त्याचबरोबर नवीन मंगळसूत्रही चांगल्या मुहूर्तावर परिधान करावे. इतर दागिन्यांप्रमाणे ते पुन्हा पुन्हा काढू नये. मंगळसूत्र नेहमी परिधान करावे.

मंगळसूत्र घालताना ही चूक करू नका

ज्योतिष शास्त्रात मंगळसूत्राबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. यानुसार इतर कोणत्याही महिलेचे मंगळसूत्र कधीही आपण स्वत: वापरु नये. असे करणे अशुभ असते आणि याचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र घातल्याने पती-पत्नीमध्ये मतभेद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Tourism : केरळमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलाय का?

याशिवाय मंगळसूत्रात काळे मोती पुरेशा प्रमाणात वापरावेत. काही प्रमाणात सोन्याच वापर असावा. असे मंगळसूत्र पती-पत्नी दोघांचेही नशीब घेऊन येते. ज्या स्त्रिया नेहमी मंगळसूत्र घालतात त्यांना गुरु ग्रहाचे शुभ परिणाम मिळतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते असेही बोलले जाते.

Web Title: Wearing Mangalsutra Tips Never Share With Others Its Dangerous Married Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..