Wedding Decoration Tips : हळद लागली! लग्नसराईत या डेकोरेशन थीम वापरून हळदीचा कार्यक्रम करा एकदम खास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Hardik Haladi Event

Wedding Decoration Tips : हळद लागली! लग्नसराईत या डेकोरेशन थीम वापरून हळदीचा कार्यक्रम बनवा खास

 लग्नसराई सुरू झाली असून गुगलवर स्टेज डेकोरेशनच्या आयडीयांचा शोध घेणे सुरू असते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या लग्नात वापरलेली थीमच आपल्याही लग्नाला खास बनवेल असा विचार बोहल्यावर चढणारी वधू वर करतात. त्यामूळे इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपन्याही जोरात कामाला लागल्या आहेत.

कोणत्याही फंक्शनमध्ये सगळ्यांच्या नजरा स्टेजवर खिळलेल्या असतात. त्यामूळे तुम्ही स्टेज सजवताना नेहमी एक थीम लक्षात घ्या. लग्नादिवशी हॉलवर सजावट असते. पण हळदीचा कार्यक्रम घरीच साजरा केला जातो. त्यामूळे घरच्या घरी छान सजावट करता येईल अशा काही सोप्या आयडीया पाहुयात.

हळदीच्या कार्यक्रमात कोणच्या रंगाची सजावट असेल?, हा काय प्रश्न आहे का, असा विचार तूम्ही कराल. कारण तूम्हालाही माहितीय की हळदीची सजावट ही पिवळ्या रंगाचाच वापर होईल. हळदीचा कार्यक्रम कार्य दुपारी असल्याने दुपारच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही पिवळ्या रंगाच्या फुलांनी सजावट करा.

हेही वाचा: Don'ts of PCOS : पीसीओएसची समस्या असेल तर या गोष्टी मुळीच करू नका

हळदीच्या कार्यासाठी रंगमंचाच्या सजावटीसाठी पिवळ्या रंगापेक्षा चांगला रंग असू शकत नाही. पण, स्टेज डेकोरेशनसाठी पिवळ्या व्यतिरिक्त, पांढरा रंग देखील वापरू शकता. तुम्हाला हवे असेल तर वधूवराचे कपडेही पिवळ्या रंगातलेच असायला हवेत.

लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी स्टेज तयार असणे आवश्यक नाही. जर तुम्ही लग्नाची हळद,मेहंदी किंवा संगीत घरीच करणार असाल तर प्रत्येकवेळी स्टेज सजवणे तुम्हाला शक्य होणार नाही. अशावेळी घरातील झोक्याचा वापर करा. हवा असल्यास झोका आणि कार्यक्रमानंतर झोका बाजूला करून तूम्ही स्टेज वापरू शकता.

हेही वाचा: Bhide Wada : विलासराव देशमुखांनी अनुदानाला मंजुरी दिली, एकनाथ शिंदेंनी आदेश दिले; स्मारक कधी होणार?

हळदी फंक्शनसाठी स्टेज सजवताना तुम्ही लेस इज पीकॉक फंडा देखील अवलंबू शकता. तुम्हाला हवे असल्यास झेंडूच्या फुलांच्या साहाय्याने हळदीसाठी स्टेजही सजवू शकता. या प्रकारची सजावट करणे खूप सोपे आहे.

तुमची डेकोरेशन थोडी खास होईल. जसे तुम्ही स्टेजच्या मागे भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे वॉल हँगिंग्ज लावा. त्याचप्रमाणे कागदापासून बनवलेल्या छोट्या छत्र्या आणि कलाकुसरीच्या वस्तूंनीही स्टेज सजवू शकता.

हळदी कार्यक्रमाच्या सजावटीला तूम्ही केळीची पाने, मातीची मडकी यांचाही वापर करू शकता. त्यामूळे कार्यक्रमातच्या उत्साहात अधिकच भर पडेल.