Wedding Fashion Tips : ‘दुल्हन का लेहंगा सुहाना लगता है’ ; या टिप्सने ब्रायडल लेहंग्याला द्या पर्सनल टच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat anushka

Wedding Fashion Tips : ‘दुल्हन का लेहंगा सुहाना लगता है’ ; या टिप्सने ब्रायडल लेहंग्याला द्या पर्सनल टच!

ways to customize your bridal lehenga : कोणत्याही मुलीसाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. त्यामुळे तिला तिच्या खास दिवशी जगातील सर्वात स्पेशल वधूसारखे दिसायचे असते. तुमच्या खास दिवशी तुमचा लुक सर्वोत्तम बनवण्यासाठी तुम्ही डिझायनर लेहेंगा खरेदी करू शकता. पण तोच लेहेंगा दुसऱ्या नवरीनेही घातला असेल तर तुम्हाला तो अजिबात आवडत नाही. घरात लग्न ठरले की ते लग्न पार पडेपर्यंत सगळे पाहुणे, मैत्रिणी तिला टीप्स देत असतात. त्यात काही मैत्रिणी फॅशन टीप्स देतात. तर ती घरातल्यांना आवडत नाही. त्यामूळे नवरी मुलगी गोंधळून जाते. काय लुक करावा, कसा लेहंगा घ्यावा हे सजमत नाही.

बदलत्या जमान्यात नवरीचे कपडे, मेहंदी, बेल्ट यासाठी बरेच नवे ट्रेंड आले आहेत. पूर्वीपासून नवरीची केवळ मेहंदी अशी होती ज्यात नवऱ्या मुलाचे नाव लिहीले जायचे. पण, सध्या अशी बरीच  फॅशन आलीय की ज्यात उघडपणे नवरी मुलगी तिच्या होणाऱ्या पतीचे नाव लिहीते. यामध्ये नवरीची चुनरी, लेहंग्यावरील बेल्ट, ट्रेंडी ब्लाऊज अशावरही नवऱ्या मूलाचे नाव ठळकपणे लिहले जाते.

ट्रेंडी ब्लाऊज

आजकाल वधूच्या लेहेंग्यासोबतच ब्लाउजचे फॅन्सी कापडही मिळते. तुमच्या लेहेंग्याला पर्सनल टच देण्यासाठी तुम्ही ब्लाउज डिझाईन करू शकता. यावर वरात, नवरा, नवरी यांचे पॅच वर्क करू शकता. तुम्ही तुमच्या आणि जोडीदाराच्या नावाची लेस डिझाइन करून हातावरील वर्क करू शकता.

हेही वाचा: Hair Wash Water : थंड की गरम; कोणत्या पाण्याने केस धुवावे?

नावाचे लटकन

कोणत्याही ब्लाऊजची शोभा त्याचे लटकन वाढवतात. मग, लग्नाच्या लेहंग्यावर खास लटकन वापरता येतात. या लटकनवर वर वधूचे नावे, लग्नाची तारीख टाकता येते. लग्नानंतरही तुम्हाला तुमचा वधूचा लेहेंगा इतर अनेक प्रसंगी घालायचा असेल. तर लग्नाच्या दिवशी करण्यासाठी ही पद्धत वापरा. आजकाल खूप सुंदर कपलच्या नावाचे पेंडेंट बाजारात उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Blood Clotting Signs: शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे गंभीर! शरीरातील हे बदल ठरतात धोक्याची घंटा...

...कि दुल्हनिया

नवरीचा लुक अधिक तिची चुनरी खुलवते. ती कशाप्रकारे डिझाईन केलीय यावर ते अवलंबून असते. बजेटमध्ये राहून तुम्हाला तुमचा वधूचा लेहेंगा स्पेशल करायचा असेल, तर तुम्हाला ही डिझाइन जास्त आवडेल. यासाठी, तुम्हाला फक्त कस्टमाइज्ड ब्राइडल दुपट्ट्याची लेस ऑनलाइन खरेदी करायची आहे किंवा लेसमध्ये लिहून तयार केलेला कोणताही खास मेसेज लिहू शकता. ती लेस चुनरीला जोडून घ्या.

बेल्ट

लेहंगा आणि चुनरी एकत्र जोडून ठेवणारा फॅन्सी बेल्ट आजकाल ट्रेंडमध्ये आहे. त्या बेल्टवरही तूम्ही वधू वराचे नाव लिहू शकता.

टॅग्स :FashionbeautybrideTips