Wedding Loan : मुलीच्या लग्नाची चिंता सतावतेय? आता बँक देणार खास लग्नासाठी लोन, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding Loan

Wedding Loan : मुलीच्या लग्नाची चिंता सतावतेय? आता बँक देणार खास लग्नासाठी लोन, जाणून घ्या

Wedding Loan : तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नांचा सिझन सुरू झाला आहे. भारतात विवाह सोहळ्याला विशेष महत्व असल्याने लग्नात भरपूर खर्च केला जातो. लग्न सोहळा केवळ एक संस्कार न राहता प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळे ऐपती पेक्षा लग्न जोरदारच करावं असा बहुतेकांचा अट्टाहास असतो. त्यामुळे यासाठी लागणारा पैसा उभा कसा करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो.

Wedding Loan

Wedding Loan

त्यामुळे जर तुमच्याही घरात यंदा कर्तव्य असेल तर फार काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आता बँका घेऊन आल्या आहेत. वैयक्तीक पातळीवर कोणाकडून कर्ज घेतलं तर त्याला फेडणं याचं चक्रव्ह्यूव वेगळंच असतं. त्यापेक्षा बँकेचं कर्ज घेणं कधीही सुरक्षित असते. लोक वेगवेगळ्या पातळींवर लग्नांसाठी कर्ज घेतात. पण आता थेट वेडिंग पर्सनल लोन घेता येणार आहे.

हेही वाचा: Personal Loan : या १५ बँका देतील तुम्हाला सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज

Wedding Loan

Wedding Loan

प्रत्येकालाच वैयक्तीक पातळीवर संसाधनांची जुळवणी करणं शक्य नसल्याने बँकेच्या वेडिंग लोनद्वारे तुम्ही व्हेन्यू, दागिने, कॅटरींग असे महत्वाचे आणि मोठे खर्चांचा बोजा हलका करू शकतात.

हेही वाचा: Bank Loan : नव्या कर्जासाठी आता शेतकऱ्यांनासुध्दा Cibil Score अनिवार्य, काय असतं हे सिबील स्कोअर?

कसं मिळवावं कर्ज

वेडिंग लोन कोणाला, किती मिळू शकतं, त्याचे प्रकार किती, कसं मिळवावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत मिळू शकते.

टॅग्स :weddingloans