Wedding Season : लग्न सराईची शॉपिंग करताय? या टिप्स फॉलो करा, स्वस्तात होईल खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding Season

Wedding Season : लग्न सराईची शॉपिंग करताय? या टिप्स फॉलो करा, स्वस्तात होईल खरेदी

Wedding Season Shopping Tips : देव दिवाळी म्हणजे तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात आणि लगीन सराई सुरू होते. अशात तयारीची सुरूवातच शॉपिंगने होते. मग लग्नासाठी कराव्या लागणाऱ्या शॉपिंगचा विचार केला तर अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्धी शक्ती आणि बजेट तर या खरेदितच संपते. अशा वेळी नक्की कशी शॉपिंग करावी याविषयी जाणून घ्या या टिप्स

Wedding Season shopping

Wedding Season shopping

एकट्याने खरेदीला जाऊ नका

एकट्याने खरेदीला जाण्याऐवजी ज्यांच्या चॉईसवर आणि सल्ल्यावर तुमचा विश्वास आहे अशाच लोकांना सोबत घेऊन जा.

कोणासाठी खरेदी करत आहात?

तुम्ही कोणासाठी शॉपिंग करणार आहात हे ठरलेलं असेल तर त्यानुसार दुकान निवडणं सोपं जातं. शिवाय वस्तू, कपडे निवडणे सोपं होतं.

Wedding Season shopping

Wedding Season shopping

बजेट आधी ठरवा

खरेदी सुरू करण्याआधीच पैशांचा हिशेब करून ठेवा. बजेट ठरवा. म्हणजे नक्की किती पैसे आहेत अन् आवश्यक गोष्टी कोणत्या हे ठरवणं सोपं होतं.

कपडे कसे निवडावे

लग्नाच्या कोणत्या फंक्शनसाठी ड्रेस घ्यायचा आहे, रंग, पॅटर्न आधी याचा विचार करून ठेवा. थोडा ऑनलाइन अभ्यास करा मग दुकानातून खरेदी करणं सोपं होइल.

Wedding Season shopping

Wedding Season shopping

प्रत्येक ड्रेस ट्राय करू नका

खरेदीला गेल्यावर समोर आलेला प्रत्येक ड्रेस ट्राय करत बसू नका. त्यातून नेमके जे २-३ सर्वाधिक आवडले तेवढेच ट्राय करा म्हणजे कंफ्युजन होणार नाही आणि वेळही वाचेल.

टॅग्स :wedding