Hair Care Tips: लग्न ठरलंय? नवरीने चुकूनही करू नये केसांवर असे एक्सपिरीमेंट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Care Tips

Hair Care Tips: लग्न ठरलंय? नवरीने चुकूनही करू नये केसांवर असे एक्सपिरीमेंट्स

Hair Care Tips: सध्या लग्नसराई सुरू आहे. प्रत्येक नवरीला आपण लग्नात फार सुंदर दिसावे असे वाटते. मात्र सुंदर दिसण्याच्या नादात तुम्हीही जर का लग्नाच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या केसांवर असे काही एक्सपिरींट करत असाल तर ऐन लग्नदिवशी तुमची फजिती होऊ शकते. तेव्हा लग्नापूर्वी नवरीने कोणते प्रोडक्ट वापरावे आणि कोणते वापरू नये ते जाणून घ्या.

जर तुम्ही लग्नापूर्वी तुमच्या केसांवर काही उपाय करत असाल तर तुम्हाला फार काळजीपूर्वक राहाण्याची गरज असते. लग्नाआधी तुम्हाला हेअर केअर रूटीन नक्की फॉलो करायला पाहिजे. अनेक या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यावी की लास्ट मोमेंटला हे रूटीन बदलता कामा नये. जर तुम्हाला केरॅटीन व हेयर स्मूथनिंग करायची इच्छा होत असेल तर ती लग्नाच्या दोन महिन्याआधी वगेरे तुम्ही करू शकता.

१. केरॅटिन ट्रीटमेंट - स्मूथ केरॅटीन ट्रीटमेंट केल्यानंतर केस अट्रॅक्टिव्ह दिसतात. मात्र तुम्हाला ही ट्रीटमेंट करायची असेल तर ती निदान लग्नाच्या दोन महिन्याआधी करावी.

२. एक्सपिरीमेंटल हेयर कलर करू नका - हेअर कलर (Hair Care) तुमच्या केसांचा रंग तात्पुरता बदलू शकते. मात्र लग्नाआधी हेअर कलर करणं तुमच्यासाठी डोकेदुखीचं कारण ठरू शकतं. याने तुमचा स्ट्रेसही वाढेल आणि तुमच्या केसांसाठीही हा बॅड ऑप्शन ठरेल.

३. एक्सटेंशन लावू नका - लग्नाआधी तुम्ही केसांना क्लिप इन्स तर करू शकता. मात्र तुमच्या एक्सटेंशनसोबत एक्सपिरीमेंट करणं तुम्हाला कठीण जाईल. म्हणूनच क्लिप एक्सटेंशन तुमच्यासाठी सोपा आणि चांगला उपाय ठरेल. याला लावणे आधी काढणेही सरळ सोपे आहे.

हेही वाचा: Malaika Arora : मलायका Hair Care साठी करते 'हा' खास घरगुती उपाय

४. परफेक्ट केसांना लग्नाच्या दिवशी धुवू नका - लग्नाच्या दिवशी परफेक्ट हेअर हवे असतील तर लग्नाच्या दिवशी केसं धुणे टाळा. क्लिप एक्सटेंशन फार सोपं आणि टेंशनमुक्त आहे. याला लावणे आणि काढणेही फार सोपे आहे.