Weight Loss Food: भिजवलेली मनुके खाण्याचे फायदे; बद्धकोष्ठता देखील दूर होईल

जर का तुम्ही तुमचे वाढते वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येतच नसेल तर तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेल्या मनुके खाऊ शकता.
Weight Loss Food
Weight Loss FoodEsakal

वजन कमी करण्यासाठी भिजवलेले मनुका: वाढलेेले वजन कमी करणे कोणासाठीही सोपे नाही, परंतु सकस आहाराचे सेवन करून तुम्ही लठ्ठपणावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकता किंवा ते कमी करण्याच्या परिणामापर्यंत तरी पोहोचू शकता. विशेषत: सकाळी तुमचा नाश्ता आरोग्यदायी नसल्यामुळे तुम्हाला शरीरातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहार तज्ञांनी सांगितले आहे की, जर आपण सकाळी भिजवलेले मनुके खाल्ले तर वजन कमी करणे सोपे होते.

भिजवलेली मनुके खाण्याचे फायदे:

मनुका हे ड्रायफ्रुट्स श्रेणीतील एक उत्तम घटक ठेवले आहेत. मनुके खातांना रात्रीच्या वेळी काही मनुके एका भांड्यात पाण्यात भिजवून ठेवावे आणि नंतर सकाळी त्यातील पाणी काढून टाकून भिजवलेले मनुके खावे. रिकाम्या पोटी अशा मनुक्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी खूप हितकारक असते,तुम्ही जर का नियमितपणे भिजवलेले मनुके खाल्ले तर काही दिवसात तुम्हाला तुमच्या शरीरात त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Weight Loss Food
Weight Loss Foods: वेगाने वजन कमी करतील हे 5 घरगुती उपचार

चला तर मग आजच्या लेखात भिजवलेले मनुके खाल्यामुळे काय फायदे होतात याची सविस्तर माहिती पाहू या.

1. वजन होईल आपोआप कमी (Obesity)

जर का तुम्ही तुमचे वाढते वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येतच नसेल तर तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजवलेल्या मनुके खाऊ शकता. तुम्ही जर का रोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी मनुके खाल्ले तर तुमच्या पोटावरची आणि कंबरेवरची चरबी हळूहळू कमी होऊ लागते कारण मनुक्यात भरपूर फ्रक्टोज आणि ग्लुकोज आढळतात.

2.बद्धकोष्ठता होईल आपोआप दूर (Constipation)

निरोगी, उत्तम आरोग्यासाठी पोट स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. तुमच्या पोटाच्या भागात काही समस्या असल्यास तुम्ही मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या पोटाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर तुम्ही रोज सकाळी भिजवलेले मनुके खावे.असे केल्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर फायबर आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषकतत्वे मिळतील आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होणार नाही.

3.अशक्तपणा येणार नाही शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही.(Anemia)

मनुक्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरात उपस्थित असलेल्या रक्तासाठी एक अतिशय महत्वाचे पोषकतत्व आहे. ज्या लोकांना An

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com