Weight Loss Trends In 2022 : वेट लॉससाठी 'या' पाच टिप्स ठरल्या ट्रेडिंग

नव्या वर्षांच्या सुरूवातीला अनेकजण विविध गोष्टींचा संकल्प करतात. यामध्ये वजन कमी करण्याकडे अनेकांचा कल असतो.
Weight Loss Trends In 2022
Weight Loss Trends In 2022Sakal

Weight Loss Trends In 2022 : जुनं वर्ष संपताना आणि नव्या वर्षाच्या सुरूवातीला अनेकजण अनेक प्रकारचे संकल्प करतात. या संकल्पामध्ये सर्वात आघाडीवर असते ते वजन कमी करण्याचा संकल्प.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Weight Loss Trends In 2022
Yoga Trends In 2022 : निरोगी राहण्यासाठी 2022 मध्ये होता 'या' योगासनांचा ट्रेंड

2022 मध्ये सोशल मीडियावर अनेक वजन कमी करण्याचे ट्रेंड्सच्या बातम्या होत्या. आज आम्ही 2022 मध्ये वजन कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या वेट लॉस टेक्नीक सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये होत्या याबाबत सांगणार आहोत.

Weight Loss Trends In 2022
Street Food Trend In 2022 : काठी रोल ते कच्छी दाबेली; देशभरात धुमाकूळ घालणारे स्ट्रीट फुड्स

इंटरमिटेंट फास्टिंग

यावर्षी वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग वेट लॉस डाएट टेक्निक ही अनेकांच्या पसंतीस होती. वजन कमी करण्याच्या या टेक्नीकमध्ये लोक दिवसभरात ठराविक वेळेत आहार घेतात आणि उर्वरित वेळेत उपवास करतात. यामध्ये 16/8 तासांनुसार डाएट प्लॅन ठरवला जातो. ज्यात 8 तास आहार आणि 16 तास उपवास करावा लागतो. याचे योग्य पालन केल्यास वजन कमी करण्यात यश मिळू शकते.

कीटो डाएट

वजन कमी करण्यासाठीइंटरमिटेंट फास्टिंगसह अनेकांचा कीटो डाएट फॉलो करण्याकडेही कल असल्याचे पाहण्यास मिळाले. कीटो डाएटमध्ये कार्ब चे सेवन कमी केले जाते. या डाएटमध्ये सर्वाधिक फॅट, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स असलेल्या आहाराचा समावेश केला जातो. कमी कार्ब आणि हाय फॅट आहार घेतल्यास वजन झपाट्याने कमी होते. केटो डाएटमध्ये मांस, मासे, चिकन, अंडी, सी फूड, ब्रोकोली, फ्लॉवर, टोमॅटो, नट्स, सीड्स, काजू, बदाम इत्यादी पदार्थाचे सेवन करू शकता.

Weight Loss Trends In 2022
Dosa Benefits : वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट मध्ये डोसा हवाच!

प्लांट बेस प्रोडक्ट

वरील दोन्ही डाएटसह अनेकांनी वजन कमी करण्यासाठी प्लांट बेस प्रोडक्ट म्हणजेच वनस्पती-आधारित पदार्थ किंवा आहाराचे पालन करण्यावर भर दिला. वनस्पती-आधारित पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला सर्व प्रकारचे पोषक तत्व मिळण्याबरोबरच, वजन कमी करण्यास मदतगार ठरतात. यामध्ये तुम्ही फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा, कडधान्ये, काजू इत्याही पदार्थांचे सेवन करता येते.

मेडिटरेनियन डाएट

मेडिटरेनियन डाएट केल्यानेदेखील अनेकांना वजन कमी करण्यास मदत झाली. या डाएटचे तंतोतंत पालन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी या डाएटमध्ये ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, मासे, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल इत्यादींचा समावेश केला जातो. तसेच, दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी मर्यादित प्रमाणात खाऊ शकतात. मेडिटरेनियन डाएट फॉलो केल्याने हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य राहण्यास मदत होते.

Weight Loss Trends In 2022
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी दिवसातून पाच वेळा जेवा!

होम वर्कआउट

वजन कमी करण्यासाठी योग्य आहारासोबत अनेकांनी यावर्षी घरच्या घरी वर्कआउट करण्याकडेही भर दिला. कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम संकल्पना उदयास आल्याने अनेकांचा होम वर्कआउट करण्याकडे कल पाहण्यास मिळाला. होमवर्क आउटमध्ये अनेकांनी स्वतःला फीट ठेवण्यासाठी झुंबा, कार्डिओ, योगा, वेट लिफ्टिंग आदी करण्याकडे जोर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com